Join us

Kalyani Kurale : व्यक्ती व्यक्तीसाठी झुरतो..., ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम कल्याणी कुरळेला आधीच लागली होती मृत्यूची चाहूल?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 3:55 PM

Tujhyat Jeev Rangala Fame Kalyani Kurale Death : ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव हिचं काल अपघाती निधन झालं. तिने मृत्यूच्या एक दिवसाआधीच एक रिल व्हिडीओ शेअर केला होता...

Tujhyat Jeev Rangala Fame Kalyani Kurale Death :  ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव (Kalyani Kurale Jadhav) हिचं काल अपघाती निधन झालं. सांगली- कोल्हापूर महामार्गावर तिच्या दुचाकीला एका डंपरने जबर धडक दिली आणि त्यातचं कल्याणीचं निधन झालं. तिच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. अशात तिचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल.

कल्याणी सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह होती. अगदी मृत्यूच्या एक दिवसाआधीच तिने एक रिल व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. जणू कल्याणीला मृत्यूची चाहूल लागली होती...,असाच हा व्हिडीओ आहे.

‘वेळेची किंमत कळते वेळ निघून गेल्यावर आणि व्यक्ती व्यक्तीसाठी झुरतो व्यक्ती सोडून गेल्यावर...,’ असं ती या व्हिडीओत म्हणते. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडमधलं गाणं आणि कल्याणीचं ते शब्द ऐकून नेटकरीही भावुक झाले आहेत.

 कल्याणीने काही दिवसांपूर्वीच ‘प्रेमाची भाकरी’ नावाचं हॉटेल सुरू केलं होतं. काल शनिवारी  हे हॉटेल बंद करुन बाहेर पडत असताना भरधाव वेगाने आलेल्या डंपरने तिला धडक दिली. या धडकेत तिचा मृत्यू झाला.  माझे पण दिवस येणार नक्की..., अशा आशयाचा तिचा एक रिलही व्हायरल होतोय.

आता येणारी वेळच सांगलं की आम्ही किती किमती होतो..., असा तिचा रिलही चर्चेत आहे. प्राप्त माहितीनुसार, काल रात्री कल्याणीने तिचे आईवडिल आणि मुलाला जेवणासाठी हॉटेलमध्ये बोलावलं होतं. मनसोक्त गप्पा मारत कल्याणीने कुटुंबासोबत जेवण केलं. त्यानंतर 11 च्या सुमारास कल्याणी हॉटेल बंद करून कुटुंबीयांसह बाहेर पडली. कल्याणी आपल्या दुचाकीवरून घरी निघाली तर पाठोपाठ तिचे आईवडील व मुलगा रिक्षातून निघाले. यावेळी सांगली कोल्हापूर रस्त्यावर कल्याणीच्या दुचाकीला डंपरने जोरदार धडक दिली. आईवडिल व मुलाच्या समोरच हा अपघात झाला. या अपघातात कल्याणीचा जागीच मृत्यू झाला.

कल्याणी कुरळे ही छोट्या पडद्यावरुन प्रसिद्धीझोतात आली होती. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत  तिने सहाय्यक  भूमिका साकारली होती.  सन मराठी  या वाहिनीवरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेतही काम केले होते.  

टॅग्स :तुझ्यात जीव रंगलाटिव्ही कलाकारमराठी अभिनेतामृत्यूकोल्हापूरटेलिव्हिजन