Join us

'तुझ्यात जीव रंगला'मधील नंदिता वहिनीचा झाला मेकओव्हर, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 16:38 IST

धनश्री काडगावकर हिने तिच्या मेकओव्हरचा फोटो शेअर केला आहे.

तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत पाठकबाईंना धडा शिकवण्यासाठी सतत डोकं लावत असणारी नंदिता वहिनी म्हणजे अभिनेत्री धनश्री काडगावकरला या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. तिने या मालिकेत तिच्या अभिनयासह तिच्या सौदर्यांनंही रसिकांना भुरळ पाडली आहे. या मालिकेतील राणादा आणि पाठकबाईंची जोडी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेतच पण धनश्री म्हणजेच नंदिता वहिनीदेखील साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र काही दिवसांपूर्वी तिने या मालिकेतून निरोप घेतला आहे. या मालिकेतून निरोप घेतल्यानंतर तिने स्वतःचा मेकओव्हर केला आहे.

धनश्री काडगावकर हिने तिच्या मेकओव्हरचा फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. 

धनश्री काडगांवकर सोशल मीडियावर सक्रीय असून ती तिच्या चाहत्यांना तिचे अपडेट देत असते. मालिकेत साडी व पारंपारिक वेशात दिसली असली तरी ती खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस व बोल्ड आहे. तिचा हा अंदाज सोशल मीडियावर पहायला मिळतो.

धनश्री सध्या फिटनेस फ्रीक झाल्याचेदेखील सोशल मीडियावर पहायला मिळतेय.

सोशल मीडियावर तिचे वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ ती शेअर करत असते. 

टॅग्स :तुझ्यात जीव रंगलाधनश्री काडगावकरझी मराठी