Join us

'तुझ्यात जीव रंगला'च्या पाठकबाईंना ही गोष्ट वाटतेय आव्हानात्मक, वाचा कोणती ती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 12:28 PM

अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar ) पाठक बाई म्हणून घराघरात प्रसिद्ध झाली होती.'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून लोकप्रियतेचे शिखर गाठले.

अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar ) पाठक बाई म्हणून घराघरात प्रसिद्ध झाली होती.'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून लोकप्रियतेचे शिखर गाठले. अल्पावधीतच तिने रसिकांची मनं जिंकली आहेत. मालिका संपून आता बरेच दिवस झाले असले तरी पाठकबाई म्हणूनच तिला जास्त ओळखले जाते. आता ती पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला आली आहे.

अक्षया आता झी मराठीवर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या हे तर काहीच नाय (He Tar Kahich Nay) या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसतेय आणि प्रेक्षकांना आवडतेय सुद्धा. डेलीसोप केल्यानंतर कथाबाह्य कार्यक्रम करतानाच अनुभव खूप वेगळा आहे असं अक्षया म्हणते. त्याबद्दल सांगताना अक्षया म्हणाली, "मी या आधी कॉलेजमध्ये सुद्धा कार्यक्रमांसाठी अँकरिंग केलं आहे त्यामुळे अगदीच पहिला अनुभव आहे असं नाही म्हणता येणार. हे तर काहीच नाय हा कार्यक्रम सुद्धा माझ्यासाठी एक वेगळी संधी घेऊन मला अगदी योग्यवेळी मिळाला असं मी म्हणेन. खूप वर्ष डेलीसोप केल्यानंतर आता कथाबाह्य कार्यक्रम करतानाचा अनुभव खूप वेगळा आहे असं मी म्हणेन. सगळ्या मोठा बदल म्हणजे रोज शूटिंग करण्यापासून ते आठवड्यातून २ दिवस शूटिंग करणे. तसंच सूत्रसंचालन करत असताना लाईव्ह ऑडियन्सच्या रिऍक्शनवरून आपल्याला ऑन द स्पॉट इम्प्रोवाईज करायचं असतं. आपल्या सूत्रसंचालनातून प्रेक्षकांना कार्यक्रमाशी जोडून ठेवायचं असतं. हे खूप आव्हानात्मक आहे पण मी सिद्धू दादा आणि निलेश यांच्याकडून जितकं शिकता येईल तेवढं शिकायचा प्रयत्न करतेय."

टॅग्स :अक्षया देवधरझी मराठी