Join us

तुकारामांचा 'माणूस ते संत' प्रवास पहायला मिळणार छोट्या पडद्यावर, तुकाराम चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 16:26 IST

महाराष्ट्रासह जगभरात संत तुकाराम महाराजांच्या विचारांनी प्रभावीत मोठा समुदाय आहे.

 महाराष्ट्राचे लाडके संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावर आधारित 'तुकाराम' या भव्य चित्रपटाचा प्रीमियर शो फक्त मराठी वाहिनीवर होणार आहे. या चित्रपटातून तुकारामांचा 'माणूस ते संत' असा प्रवास पहायला मिळणार आहे. तुकारामांच्या जीवनातील अनेक पदर चित्रपटातून उलगडून दाखविण्याचा प्रयत्न  केला गेला आहे. रविवारी सकाळी ११:०० वा. आणि संध्याकाळी ६:३० वाजता, फक्त मराठी प्रिमीयर मध्ये या चित्रपटातून संत तुकारामांची भेट घडणार आहे. 

महाराष्ट्रासह जगभरात संत तुकाराम महाराजांच्या विचारांनी प्रभावीत मोठा समुदाय आहे. मराठी समजणाऱ्यांना 'तुकाराम' माहित नाही अशी व्यक्ती सापडणं दुर्मिळ आहे. त्यामुळे हा चित्रपट मराठीसह अमराठी प्रेक्षकांनाही समजेल असा, तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचा बनविण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, असे निर्माते संजय छाब्रिया यांचे म्हणणे आहे.

अभिनेते जितेंद्र जोशी यांनी तुकारामांची अप्रतिम भुमिका साकारली आहे. तुकारामांच्या पत्नीची भूमिका राधिका आपटे यांनी केली असून बालकलाकार पद्मनाभ गायकवाड, वीणा जामकर, शरद पोंक्षे, प्रतीक्षा लोणकर, यतीन कार्येकर यांच्याही यात महत्वाच्या भूमिका आहेत. अजित दळवी, प्रशांत दळवी लिखित ‘तुकाराम’ चित्रपटाचे जेष्ठ संगीतकार अशोक पत्की व अवधूत गुप्ते हे चित्रपटाचे संगीतकार असून काही गाणी कवी दासू वैद्य यांनी लिहिली आहेत. कलादिग्दर्शक एकनाथ कदम यांनी या चित्रपटातील १६०९ ते १६५० चा कालावधी उभा केला आहे.

टॅग्स :जितेंद्र जोशी