'तुला पाहते रे' मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले असून या मालिकेतील बिपीन टिल्लू म्हणजेच अभिनेता प्रथमेश देशपांडेने देखील आपल्या भूमिकेतून रसिकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. प्रथमेशने तुला पाहते रे मालिकेपूर्वी काही हिंदी मालिकांमध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत. मात्र बिपीन टिल्लूची भूमिका त्याच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरल्याचे तो सांगतो. खरेतर तो अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी मार्केटिंग क्षेत्रात जॉब करत होता. इतकेच नाही तर सुरूवातीला अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी त्याच्या घरच्यांचा त्याला पाठिंबा देखील नव्हता. मात्र त्याची अभिनयाप्रती निष्ठा पाहून त्यांनीदेखील त्याला अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी परवानगी दिली. अभिनय क्षेत्राच्या प्रवासाबाबत प्रथमेशने सांगितले की, तीन वर्षांपासून मी अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. त्यापूर्वी मी मार्केटिंग क्षेत्रात जॉब करत होतो. हा जॉब करत असताना काही कालावधीनंतर मला कंटाळा आला. मग, मी माझे पॅशन म्हणजे अभिनयाकडे वळण्याचा निर्णय घेतला. आई-बाबांनी सुरूवातीला अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी नाही सांगितले. मात्र नंतर त्यांनी दोन वर्षात तू काहीतरी करून दाखवलेस तरच तू या क्षेत्रात काम करू शकतोस.
मला या भूमिकेसाठी बेस्ट कॉमेडी अॅक्टरसाठी नामांकन मिळाले. बिपिन टिल्लू या भूमिकेने मला एवढे काही दिले की मी देवाचे व माझ्या आई- बाबांचे आभार मानतो. त्याचबरोबर अपर्णा केतकर, अतुल केतकर, झी मराठी, अभिजीत गुरू, शर्वरी पाटणकर, शेखर ढवळीकर, गिरीश मोहिते, चंद्रकांत गायकवाड, माझे सहकलाकार, क्रू व आई-बाबा आणि आशुतोष यांचा मी खूप आभारी आहे.'