Join us

"लहानपणी कुस्तीमध्ये मला २१ रुपये बक्षीस मिळाले होते", हृषिकेश शेलारनं सांगितला 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 4:03 PM

झी मराठीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.

झी मराठीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या मालिकेत अभिनेता हृषिकेश शेलार 'अधिपती'ची भूमिका साकारत आहे. मालिकेतील अधिपतीचा रांगडेपणा पण तितकाच त्याचा प्रेमळ स्वभाव प्रेक्षकांना आपलंसं करत आहे. प्रत्येक सप्ताहात ही मालिका काहींना काही नवीन वळण घेत असते. या मालिकेत नुकतंच कुस्तीचा एक सीन दाखवला गेला. कुस्तीच्या सीनसाठी केलेली मेहनत आणि लहानपणीचा कुस्तीचा अनुभव अभिनेत्याने चाहत्यांसोबत शेअर केलाय. 

हृषिकेश शेलारने सांगितले, 'कुस्तीचा अनुभव खूप छान होता. सलग ३ दिवस शूट करत होतो. थकलो होतो, जेव्हा तो सीन शूट झाला तेव्हा छान वाटलं. मानसिकरित्या काटक झालो आणि शारीरिक तंदुरुस्ती आवश्यक आहे याची पुन्हा आठवण या सीनने करून दिली. मला आनंद आहेत कि मी यशस्वीपणाने कुस्ती सीन करू शकलो. मला फारसं  कुस्तीच ज्ञान नाही. पण एकदा लहानपाणी गावाकडे असताना मी कुस्ती खेळलो होतो आणि त्यात मला २१ रुपैयेच बक्षीस मिळालं होतं'. 

पुढे तो म्हणाला,  'कुस्तीचे डाव किंवा तालिमीत मी शिकलो नाही. मी व्यायाम नियमितपणे अनेक वर्ष करत आहे. मग ते घरी असो, किंवा व्यायामशाळेत. व्यायामाची मला आवड आहे  आणि त्याचा मला इथे फायदा झाला आहे. सीनसाठी सेटवरती जे तालिमीतली  लोक आले होते. मी त्याच्याकडून काही डाव शिकलो आणि त्याचा उपयोग मी सीनमध्ये त्याचा वापर करायचो. काही वर्षांपूर्वी माझा एकदा अपघातामध्ये पायाचा  लिगामेंट टियर झाला होता.  तर त्याची काळजी घ्यावी लागत होती. हा सीन करण्यासाठी फक्त माझी एकट्याची मेहनत नाही पूर्ण टीममुळे हा सीन उत्तमपणे झाला', असा अनुभव हृषिकेशने यावेळी शेअर केलाय. 

'तुला शिकवीन चांगलाच धडा'मालिकेविषयी बोलायचं झाल्यास भुवनेश्वरीने अधिपती आणि अक्षराला १० दिवसांचे आव्हान दिलं होतं. घराबाहेर राहून दोघांना ते आपल्या संसाराची जबाबदारी घेण्यास सक्षम आहेत, हे सिद्ध करून दाखवायचं होतं. अधिपती-अक्षराच्या या कसोटीत खूप आव्हान ही येतात. जिथे कुस्तीमध्ये जिंकलेले पैसे दुर्गेश्वरी-चंचला चोरतात, भुवनेश्वरी ही अक्षरा-अधिपती ज्या काकांच्या घरात राहतात, त्या काकांना दोघांकडून घराचं १० हजार भाडं वसूल करायला लावते.  पण सगळी आव्हान पूर्ण करुन अक्षरा-अधिपती घरी येतात. घरात सगळे त्यांचं गोड कौतुक, स्वागत करतात. 

टॅग्स :मराठी अभिनेताटेलिव्हिजनसेलिब्रिटीझी मराठी