Join us

'तुला शिकवीन चांगलाच धडा'फेम अभिनेत्रीने दिली प्रेमाची कबुली; 'या' दिग्दर्शकाने केलं रोमॅण्टिक अंदाज प्रपोज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 14:31 IST

Ruta kale: रुता एका लोकप्रिय मराठी दिग्दर्शकाला डेट करत आहे.

काही दिवसांपूर्वीच छोट्या पडद्यावर सुरु झालेली मालिका म्हणजे तुला शिकवीन चांगलाच धडा. शिवानी रांगोळे(shivani rangole), कविता लाड-मेढेकर (kavita lad-medhe) आणि ऋषिकेश शेलार (hrishikesh shelar) यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका सध्या चांगलीच गाजताना दिसत आहे. शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करणारी अक्षरा आणि तिला या कार्यात रोखणारी तिची सासू भुवनेश्वरी यांची ही तिखट-गोड जोडी प्रेक्षकांना अल्पावधीत भावली. त्यामुळे या मालिकेची सोशल मीडियावर वरचेवर चर्चा होत असते. परंतु, सध्या नेटकऱ्यांमध्ये या मालिकेतील एका अन्य दुसऱ्या अभिनेत्री चर्चा रंगली आहे. या अभिनेत्रीला तिच्या रिअल लाइफ बॉयफ्रेंडने चक्क फिल्मी अंदाजात प्रपोज केलं आहे.

या मालिकेतील अभिनेत्री रुता काळे (ruta kale) हिची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. रुताने या मालिकेत अक्षराच्या बहिणीची इराची भूमिका साकारली आहे. मालिकेत आपल्या रिल लाइफ पार्टनरसाठी वाट्टेल ते करणाऱ्या इरासाठी तिचा रिअल लाइफ पार्टनर सुद्धा काहीही करायला तयार आहे. त्यामुळेच त्याने रोमॅण्टिक अंदाजात तिला प्रपोज केलं. रुताने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत तिच्या प्रियकराने तिला प्रपोज केल्याचं सांगितलं. तसंच जाहीरपणे प्रेमाची कबुलीही दिली आहे.

रुता प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक अभिषेक लोकनर याला डेट करत असून अभिषेकने तिला फिल्मी अंदाजात गुडघ्यावर बसून प्रपोज केलं आहे. यावेळचे फोटो रुताने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सोबतच आता आणि कायमस्वरुपी, असं कॅप्शनही तिने दिलं आहे. तिचे हे फोटो पाहिल्यावर सेलिब्रिटींनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, रुताने या मालिकेसह नाटक, सिनेमामध्येही काम केलं आहे. पंधरवडा, अनवट या चित्रपटात तिने काम केलं आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अभिषेक लोकनर याने केलं होतं. सुरुवातीला मैत्री असलेली ही जोडी प्रेमात पडली आणि त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. 

टॅग्स :टेलिव्हिजनकविता लाडशिवानी रांगोळेसेलिब्रिटी