Join us  

अधिपती-अक्षराच्या संसार भुवनेश्वरी टाकणार मीठाचा खडा; दुर्गेश्वरीच्या मदतीने रचणार नवा कट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 3:49 PM

Tula shikvin changlach dhada: अधिपती आणि अक्षरा यांचा संसार आता खऱ्या अर्थाने सुरु झाला आहे. परंतु, ही गोष्ट भुवनेश्वरीला कळते आणि तिचा संताप होतो.

'तुला शिकवीन चांगलाच धडा'  ही मालिका दिवसेंदिवस रंजक वळण घेत आहे. त्यामुळे मालिकेत येणारे चढउतार प्रेक्षक चांगलेच एन्जॉय करत आहेत. सध्या या मालिकेत अक्षरा आणि अधिपती यांच्यातलं प्रेम फुलतांना दिसत आहे. नुकतीच अक्षराने अधिपतीसमोर तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे. त्यामुळे त्यांच्या नात्याची नव्याने सुरुवात झाली आहे. मात्र, त्यांच्या या संसारात पुन्हा एकदा भुवनेश्वरी मीठाचा खडा टाकणार आहे.

अधिपती आणि अक्षरा यांचा संसार आता खऱ्या अर्थाने सुरु झाला आहे. त्यामुळे याचा आनंद अधिपतीचे वडील आणि आजी या दोघांनाही आहे. म्हणूनच, आजी त्यांची खोली छान फुलांनी सजवते. परंतु, ही गोष्ट भुवनेश्वरीला कळते आणि तिचा संताप होतो. इतकच नाही तर अधिपती आणि अक्षरा यांना वेगळं करण्यासाठी भुवनेश्वरी पुन्हा एक नवा कट रचणार आहे.

दरम्यान, भुवनेश्वरी घरातल्यांसमोर तिलाही आनंद झाल्याचं नाटक करते. आणि, दुसरीकडे दुर्गेश्वरीला अधिपती-अक्षराची खोली नीट सजवायला सांगते. आता, दुर्गेश्वरीला खोली सजवायला सांगून भुवनेश्वरी कोणती नवी खेळी खेळणार आहे हे प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच कळणार आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारकविता लाडशिवानी रांगोळे