Join us

'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत अक्षरा-अधिपतीमध्ये फुलणार प्रेमाचं नातं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2023 3:21 PM

मालिकेत दिवाळीत अक्षरा आणि अधिपतीमध्ये प्रेमाचं नातं खुलताना दिसणार आहे.

 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील अधिपती आणि अक्षरा या पात्रांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले आहे. ही मालिका आता एका वळणावर पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी अक्षरा आणि अधिपती लग्नबंधनात अडकले आहेत. अक्षरा आणि अधिपतीचा नव्या संसाराला सुरुवात झाली आहे. 

आता मालिकेत दिवाळीत अक्षरा आणि अधिपतीमध्ये प्रेमाचं नातं खुलताना दिसणार आहे. येत्या आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळेल अक्षरा आणि भुवनेश्वरीमध्ये  शाळेत जाण्यावरून मतभेद होणार आहेत. बायको की आई ह्या परिस्थितीमुळे अधिपतीला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. ही तारेवरची कसरत अधिपती कशी निभावून नेणार हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.

अक्षर-अधिपतीच्या जीवनात भुवनेश्वरीच्या अटींशिवाय मालिकामध्ये मज्जा नाही येत. ह्या वेळी अधिपती अडचणीत आला आहे. अधिपती काही ना काही करून नक्की ह्या परिस्थिती चा उपाय काढेल, कारण त्याच्यासाठी बायको आणि आई दोघांचं मन जपणं गर्जेचे आहे. अक्षराला  शाळेत जायला परवांगी मिळणार का ? आधिपती कशी भुवनेश्वरी ची समजूत काढणार? अक्षरा-अधिपतीच नातं कसा फुलून येणार? ह्या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळेल येणाऱ्या भागात

टॅग्स :टिव्ही कलाकार