तुनिषा शर्मा(Tunisha Sharma) मृत्यू प्रकरणाच्या तपासात सातत्याने नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी शिजान खान(Sheezan Khan)च्या सीक्रेट गर्लफ्रेंडची ओळख पटवली आहे. वालीव पोलिसांच्या वरिष्ठ निरीक्षकांच्या म्हणण्यानुसार, तुनिषाच्या मृत्यूप्रकरणी ज्या मुलीची चौकशी केली जात आहे ती 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल'च्या सेटवर काम करत होती.
पोलिस अधिकाऱ्यांनी, ही मुलगी सेटवर कोणते काम करते हे सांगितले नाही. मात्र, ही तरुणी शिजानची सीक्रेट गर्लफ्रेंड असल्याचा दावाही पोलीस अधिकाऱ्याने फेटाळून लावला आहे. वालीव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुनिषाने २४ डिसेंबर रोजी आत्महत्या केल्यानंतर तो त्याच्या सीक्रेट गर्लफ्रेंडसोबत सुमारे २ तास बोलत होता. चौकशीनंतर पोलीस लवकरच तिचा जबाब नोंदवणार आहेत.
पोलिसांना तुनिषा शर्माचा मोबाईल फोन या मालिकेच्या सेटवर खराब अवस्थेत मिळाला आहे. आत्महत्येपूर्वी हा फोन तुनिषाने स्वत: खराब केला होता की अन्य कोणी तो खराब केला होता, याचाही तपास पोलीस करत आहेत. याशिवाय पोलिसांना मालिकेच्या सेटवर एक पत्रही सापडले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुनिषाने हे पत्र काही दिवसांपूर्वी शीजानसाठी लिहिले होते.
आत्महत्येपूर्वी तुनिषा आणि शिजान यांच्यात सेटवर बातचीत झाल्याचेही पोलिसांनी सांगितले, मात्र हे संभाषण नेमके काय झाले याचे उत्तर शिजान देत नाही. एक दिवसापूर्वी पोलिसांना शिजान आणि त्याच्या सीक्रेट गर्लफ्रेंडच्या व्हॉट्सअॅप चॅटचे २५० ते ३०० पाने मिळाले होते. या चॅटच्या आधारे पोलीस शिजानची पुन्हा चौकशी करणार आहेत. शिजान जून २०२२ पासून या सीक्रेट गर्लफ्रेंडशी बोलत होता.