तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्या प्रकरणातील आरोपी शिजान खान याला शुक्रवारी वसई किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले, तिथे त्याला आणखी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाशी संबंधित इतर लोकांचे जबाब नोंदवायचे आहेत, असे पोलिसांचे म्हणणे आहे. स्टुडिओ आणि जवळपासच्या ठिकाणी बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासत असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. गेल्या महिनाभरातील सर्व नोंदी तपासण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता शिजान खान शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहे. शिजान खानच्या जामिनावर शनिवारी तिसऱ्यांदा सुनावणी होणार आहे. पोलिसांनी या प्रकरणाबाबत न्यायालयाला सांगितले की, त्यांना तपास पुढे चालवायचा आहे, कारण आतापर्यंत तुनिषा शर्माचा मोबाइल फोन लॉक होता. पण आता पोलिसांनी त्याचा अॅपल फोन अनलॉक केला आहे आणि त्यातील चॅट्स शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
शिजान खान करत नाहीये तपासात सहकार्य कोर्टात पोलिसांनी सांगितले की, शिजान खान तपासात पूर्ण सहकार्य करत नाही. अभिनेत्याच्या व्हॉट्सअॅपवरून अनेक चॅट्स डिलीट करण्यात आल्या आहेत, पण शिजान त्याबद्दल काहीही सांगत नाही. पोलिसांनी सांगितले की, काही हटवलेल्या चॅट तुनिषा शर्मासोबतही होत्या, अशा परिस्थितीत ते त्यांच्या तपासात गुंतले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिजानच्या काही चॅट त्याच्या 'सिक्रेट गर्लफ्रेंड'सोबतही झाल्या आहेत. यासोबतच तुनिषा शर्माच्या मोबाईलमध्ये जे काही चॅट सापडले आहेत, त्याची चौकशी अजून व्हायची आहे.
शिजानने तुनिषा शर्माला मारली होती थप्पड तुनिषा शर्माच्या आईने शीजनवर आरोप केला आहे की अभिनेत्याने तिच्या मुलीला थप्पड मारली. एवढेच नाही तर शीजानचे कुटुंब तुनिशाला ब्लॅकमेल करायचे, तसेच तिला उर्दू शिकवायचे. अशा स्थितीत पोलिस या अँगलनेही तपास करतील, असे मानले जात आहे.