Tunsiha Sharma Death Case: तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी पोलिस हत्या आणि आत्महत्या या दोनही बाजूंनी तपास करत आहेत. तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणातील शिजान खान(Sheezan Khan)ची कोठडी 30 डिसेंबर 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल' (Ali Baba: Dastan-E-Kabul) च्या स्टार कास्ट आणि क्रू मेंबर्सपासून ते तुनिषा शर्माच्या कुटुंबीयांपर्यंत, पोलिस सर्वांचे जबाब नोंदवत आहेत.
कुटुंबाचा जबाब नोंदवणार पोलिस एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार, आज २९ डिसेंबर २०२२ ला वालीव पोलिसांनी तुनिषा शर्माची मावशी, मामा आणि दोन ड्रायव्हरला चौकशीसाठी बोलवलं आहे. पोलीस या लोकांचे जबाब नोंदवणार आहेत. याशिवाय तुनिषाच्या आईलाही तिच्या जबाबासाठी पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले आहे. आपली मुलगी गमावल्यानंतर त्याची आई झालेली अवस्था बघून अनेकांचे डोळे पाणावले. म्हणून त्या आज आपला जबाब नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात येतील की नाही हे निश्चित नाही.
तुनिषा शर्माच्या आईनं शिजानवर केलंत आरोपतुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर तिच्या आईने अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंड शिजान खानवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. शिजानवर तुनिषाची फसवणूक केल्याचा आरोप लावला आहे. तुनिषाच्या मृत्यूनंतरच तिच्या आईने शिजानविरुद्ध वालीव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर लगेचच पोलिसांनी तिला अटक केली. प्रथम त्याला 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. शिजान पोलिसांना सहकार्य करत नसल्याने त्याची कोठडी 30 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
तुनिषा शर्माने 24 डिसेंबर 2022 रोजी 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल'च्या सेटवर आत्महत्या केली होती. रिपोर्टनुसार, तुनिषा शर्मा आणि शिजानचं १५ दिवसांपूर्वीच ब्रेकअप झालं होतं. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.