Join us

तुनिषाच्या निधनानंतर आईची झालीय वाईट अवस्था, म्हणाल्या, शिजानने तुनिषाला धोका दिला..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 18:52 IST

तुनिषाच्या निधनानंतर तिची आई वनिता शर्मा यांची वाईट अवस्था झाली आहे. वनिता शर्मा यांचा लेटेस्ट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय यात त्यांनी शिजान खानवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

Tunisha Sharma Death Case: टेलिव्हिजन अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणामुळे टेलिव्हिजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. तुनिषाच्या आत्महत्येनंतर तिच्या आईनं आता धक्कादायक खुलासे केले आहेत. तुनिषाचा सहकलाकार आणि तिचा बॉयफ्रेंड शिजान खान याच्यावर तुनिषाच्या आईनं धक्कादायक आरोप केले आहेत.  सोशल मीडियावर एक लेटेस्ट व्हिडीओ व्हायरल होतोय त्या तुनिषाची आई शिजानवर अनेक गंभीर आरोप करताना दिसतेय.  

तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा यांनी शिजानने आपल्या मुलीला धोका दिला  आणि त्यानं माझ्या मुलीचं आयुष्याचं वाटोळं केलं असा आरोप तुनिषाच्या आईनं केला आहे. आधी तो तुनिषासोबत रिलेशनशीपमध्ये आला आणि लग्नाचं  वचनही दिले. यानंतर त्याने तुनिषासोबत ब्रेकअप केलं. एवढेच नाही तर त्याचवेळी तो इतर कोणासोबतही अफेअर सुरु होते, तरीही त्यानं माझ्या मुलीशी संबंध प्रस्थापित केले, 3-4 महिने तिचा वापर करून तिची फसवणूक केली.

तुनिषाची आई पुढे म्हणाली, मला एवढंच म्हणायचं आहे की, शिजानला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. माझी मुलगी मी गमावली आहे, त्याला कोणत्याही परिस्थितीत सोडू नका. तुनिषा शर्माच्या आईने शिजान मोहम्मद खानवर गंभीर आरोप केले आहेत. 

पोलिसांच्या कोठडीत शिजानतुनिषा शर्माची आई वनिता शर्मा यांच्या तक्रारीवरून मुंबईतील वसई पोलिसांनी शिजान मोहम्मद खानला अटक केली. यानंतर पोलिसांनी न्यायालयाकडे शिजानची ४ दिवसांची कोठडीही मागितली आहे. त्याअंतर्गत पोलीस शिजानची सतत चौकशी करत आहेत. तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणातील पोलिस तपासानुसार, शिजनने पोलिसांना सांगितले की- 'माझे आणि तुनिषाचे धर्म वेगळा असल्यामुळे ब्रेकअप झाले. तसंच आमच्यातील वयाचे अंतरही आमचे नातं तुटण्याचे प्रमुख कारण ठरले. 

टॅग्स :टिव्ही कलाकारमृत्यू