Join us

Sheezan Khan : शिझान खान 11 जानेवारीपर्यंत तुरुंगातच; जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2023 5:11 PM

शिजान खानच्या वकिलाने अभिनेत्याच्या जामिनासाठी अर्ज केला होता, पण...

Tunisha Sharma Suicide Case: तुनिषा शर्मा प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. तुनिषाचा एक्स बॉयफ्रेंड आणि 'अली बाबा दास्तान-ए-काबुल'चा मुख्य अभिनेता शिजान खानला ताब्यात घेऊन पोलीस चौकशी करत आहेत. दरम्यान, शिजान खानच्या वकिलाने अभिनेत्याच्या जामिनासाठी अर्ज केला होता, त्यावर वसई न्यायालयात सुनावणी झाली. शिजान खानच्या वकिलाने आपली बाजू मांडली मात्र तुनिषाच्या वकिलाने आणि सरकारी बाजूने वेळ मागितला. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयाने 11 जानेवारीपर्यंत पुढे ढकलली आहे.

शीझानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर पंधरा दिवसांनी 24 डिसेंबर रोजी तुनिषाने सेटवर आत्महत्या केली होती. शिजान खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली 25 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून शिजान न्यायालयीन कोठडीत आहे.

याच दरम्यान, तुनिषाची आई वनिता शर्मा यांनी शिजान खानवर गंभीर आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या, तुनिषाला वाचवले जाऊ शकले असते. तिला जवळ असलेल्या हॉस्पिटलला न्यायला हवे होते, अशी अपेक्षा व्यक्त करत शिजान खानवर सडकून टीका केली. तुनिषाला जवळच्या हॉस्पिटलला न्यायचे सोडून दूर अंतरावर असलेल्या हॉस्पिटलला का नेले, अशी विचारणा वनिता शर्मा यांनी केली. 

दरम्यान, शिजान खान ड्रग्ज सेवन करायचा. मात्र, तो अमली पदार्थ कधीपासून घेत होता, याची माहिती नाही. एवढेच नाही तर तुनिशाचे मामा पवन शर्माप्रमाणेच आता आईनेही शिजानला भेटल्यानंतर तुनिषाची जीवनशैली बदलल्याचे सांगितले आहे. तिने हिजाब घालायला सुरुवात केली होती आणि शिजान तिला उर्दू शिकवत होता. मुलीच्या मृत्यूनंतर शिजानने तिला मदत केली नाही, असे आरोप करण्यात आले आहेत.

 

टॅग्स :तुनिशा शर्मागुन्हेगारी