Tunisha Sharma Case: टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma)आत्महत्येनंतर तिचा एक्स-बॉयफ्रेंड शिजान खान (Sheezan Khan) याला पोलिसांनी अटक केली आहे. तुनिषाच्या कुटुंबीयांनी अभिनेत्रीच्या मृत्यूसाठी शिजानला दोषी ठरवत अनेक आरोप केले आहेत. काल शिजानला कोर्टात हजर करण्यत आलं. पण यावेळी पोलिसांनी शिजानला अक्षरश: फरफटत नेलं. पोलिस शिजानला अनवाणी पायांनी फरफटत नेत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि हे पाहून अनेकांनी पोलिसांवर संताप व्यक्त केला आहे.
शिजानला कोर्टात नेत असताना कोर्टाबाहेर मीडिया व लोकांची गर्दी होती. या गर्दीपासून वाचवण्यासाठी पोलिसांनी शिजानला घाईघाईत गाडीतून बाहेर काढलं आणि त्याला तितक्याच घाईत कोर्टाच्या आत नेलं. पण अनेक लोकांना पोलिसांचं हे वागणं खटकलं. पोलिस अनवाणी पायानं शिजानला फरफटत नेत आहेत, हे पाहून अनेकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली.
त्याने गुन्हा कबुल केला की त्याच्याविरोधात पुरावे मिळाले म्हणून पोलिस त्याला अशी वागणूक देत आहेत? हे वाईट आहे, अशा भावना एका युजरने व्यक्त केला. ‘त्याने हत्या केली असती तर ते चूक असतं. पण ब्रेकअप केलं आणि मुलीने आत्महत्या केली म्हणून तुम्ही त्याला घरातून उचलाल? हा कुठला न्याय आहे?’, अशी कमेंट एका युजरने केली. अनेकांनी पोलिसांच्या वागण्यावर संताप व्यक्त केला. तो दोषी आहे, असं पोलिस त्याला का वागवत आहेत? अनवाणी पायानं असं ओढत नेणं, अशी अमानवीय वागणूक का? अशा कमेंटही अनेकांनी केल्या आहेत.
तुनिषा शर्मा व शिजान खान दोघंही एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. पण काही दिवसांआधी शिजानने तुनिषासोबत ब्रेकअप केलं होतं. यामुळे तुनिषा तणावात होती. तुनिषाच्या कुटुंबीयांनी शिजानवर अनेक आरोप केले आहेत. शिजान तुनिषाला फसवत होता. त्याचे दुसऱ्या मुलींसोबत संबंध होते. त्याने तुनिषाला लग्नाचं वचन देऊन तिचा वापर केला, असा तनिषाच्या आईचा आरोप आहे.