Tunisha Sharma Suicide: लग्नासाठी तुनिषाचं धर्मांतर करण्याचा होता शिजानचा इरादा? पोलीस करणार तपास!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 01:41 PM2022-12-26T13:41:32+5:302022-12-26T13:51:48+5:30
Tunisha Sharma Suicide: तुनिषाच्या आत्महत्येबाबत शिजान खानचा पोलीस चौकशीत मोठा खुलासा
Tunisha Sharma Suicide: टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी एक मोठं अपडेट समोर आलं आहे. पोलिस कोठडीत तुनिषाचा एक्स बॉयफ्रेन्ड शिजान खानने त्याच्या व तुनिषाबद्दल अनेक खुलासे केले आहेत. तुनिषा व शिजानचं 15 दिवसांआधीच ब्रेकअप झालं होतं. हे ब्रेकअप होण्यामागचं कारण काय होतं? हे आता समोर आलं आहे.
तुनिषाच्या आत्महत्येनंतर शिजानला अटक करण्यात आली. ‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, त्याने पोलिसांना ब्रेकपचं कारण सांगितलं आहे. वेगवेगळा धर्म आणि वयातील अंतर यामुळे आमचं ब्रेकअप झाल्याचं शिजानने पोलिसांनी सांगितलं. तुनिषाने मृत्यूआधी काही दिवसांपूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी मी तिला वाचवलं होतं. मी याबद्दल तुनिषाच्या आईलाही माहिती दिली होती आणि त्यांनी मला तुनिषाची काळजी घ्यायला सांगितल्याचंही त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे. शिजानने दिलेल्या या माहितीनंतर पोलिसांनी यादिशेने तपास सुरू केला आहे. तुनिषाने याआधी कधी आत्महत्येचा प्रयत्न केला होता? त्यामागे ब्रेकअप हे कारण होतं की कारण काही वेगळंच होतं? याचा पोलिस शोध घेत आहेत.
तुनिषाचा धर्म बदलू इच्छित होता शिजान?
पोलिसांनी केलेल्या तपासात, शिजानने तुनिषासोबतच्या अफेअरची कबुली दिली आहे. मात्र धर्म आणि वयातील अंतर यामुळे आम्हा दोघांचं ब्रेकअप झाल्याचंही स्पष्ट केलं आहे. आता पोलिसांनी यासंदर्भाने तपास सुरू केला आहे. लग्नासाठी तुनिषाचं धर्मांतर करण्याचा शिजानचा इरादा होता का? हे पोलिसांना जाणून घ्यायचे आहे.
15 मिनिटांत असं काय झालं?
तुनिषा केवळ 20 वर्षांची होती तर शिजान हा 28 वर्षांचा होता. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येच्या दिवशी तुनिषा आणि शिजान यांनी एकत्र लंच केलं होतं. पहिली शिफ्ट संपल्यानंतर दोघांनी मेकअप रूममध्ये दुपारी 3 वाजता एकत्र जेवण केलं. यानंतर 3.15 वाजता तुनिषाने गळफास लावून आत्महत्या केली. त्या 15 मिनिटांत असं काय झालं की तुनिषाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं, याचाही पोलिस तपास करत आहेत.