Tunisha Sharma Suiside Case: तुनिषा आत्महत्या प्रकरणाचा तापस पोलिस कसून करत आहेत. पोलीस या प्रकणातील प्रत्येक बाजूचा विचार करतायेत. या प्रकरणी पोलि, शिजान खानच्या जबाबासोबतच तुनिषा शर्माची आई, मामा आणि मावशी यांचीही चौकशी करत आहेत. पोलिसांनी तिघांच्या जबाब नोंदवण्यासाठी सीक्रेट जागेची निवडली केली होती, जिथे कुटुंबीयांना बोलावून त्यांचे जबाब नोंदवले गेले. पोलिसांच्या तपासात ही गोष्ट समजली की. तुनिषानं आत्महत्या करण्याच्या काही वेळा पूर्वीच कुटुंबातील सदस्याशी बोलणं झालं होतं.
आतापर्यंत या प्रकरणी २५ लोकांचं जबाब नोंदवण्यात आलं आहे. अनेक लोक वेगवेगळ्या गोष्टी समोर आणत आहेत. या सर्व गोष्टींची जुळवाजुळव करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे, जेणेकरून ठोस पुरावे गोळा करता येतील. आरोपी शिजान खान उद्यापर्यंत पोलिस कोठडीत आहे. शिजानच्या कोठडीत वाढ करावी लागणार का, याबाबत पोलीस आपला युक्तिवाद मांडणार आहेत.
पोलिसांसमोर आहेत मोठी आव्हान पोलीस शिजान आणि तुनिषाच्या चॅट स्कॅन करत आहेत. सुमारे 200-250 पानांच्या गप्पा समोर आल्या आहेत. ज्याचा तपास पोलिसांना करावा लागेल. या प्रकरणाबाबत पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. कारण आता सर्वांच्या नजरा या हायप्रोफाईल प्रकरणाकडे लागल्या आहेत. शिजान खानबाबत अनेक थिअरी समोर येत आहेत.
तुनिषा व शिजान हे दोघं ‘अलिबाबा: दास्तान ए कबूल’ या मालिकेत लीड अॅक्टर्स होते. सेटवरच दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मात्र सुमारे 15 दिवसांपूर्वी शिजानने तुनिषासोबत ब्रेकअप केलं होतं. यामुळे तुनिषा निराश झाली होती.
तुनिषाच्या आईने अभिनेता शिझान खानवर गंभीर आरोप केले आहेत. शिजानमुळेच मुलगी तुनिशाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं. तर तुनिशाने आत्महत्या केली त्याच्या एक दिवस आधीच तुनिषाची आई मालिकेच्या सेटवर आली होती. त्यांनी शिजान खानसोबत बराच वेळ चर्चा केली. तसंच तुनिषापासून दूर राहा असंही त्यांनी शिजानला ठणकावून सांगितलं.