लग्नच ठरले टर्निंग पांइट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2016 6:42 AM
हिरोईइनचे लग्न झाले की करियर थांबते असे लोक म्हणतात. पण माझ्या बाबतीत म्हणाल, तर लग्नच करियर पॉर्इंट ठरला. लग्नानंतर ...
हिरोईइनचे लग्न झाले की करियर थांबते असे लोक म्हणतात. पण माझ्या बाबतीत म्हणाल, तर लग्नच करियर पॉर्इंट ठरला. लग्नानंतर मुलीचा पायगुण चांगला असेल, तर नवºयामुलाला यश मिळते; पण नेमकं माझ्याबाबत हे उलट ठरलं आहे. म्हणून माझ्यासारखं लग्न कोणाला मानवलं नाही. लग्नानंतर विलक्षण कामाचे योग आले. अमिताभ बच्चन, रणवीर आणि आता अनिल कपूर यांच्यासोबत काम करतेय, अमृता खानविलकर बोलता-बोलताच नॉस्टॅल्जिक झाली आणि तिने आपल्या करियरचा प्रवास उलगडला... पुण्यामध्ये ‘लोकमत सखी मंचा’च्या वतीने आयोजित ‘खेळ मांडियेला’ कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झालेल्या अमृताने अनेक आठवणी ‘लोकमत सीएनएक्स’सोबत शेअर केल्या. तिच्या सोनेरी प्रवासातील अनेक प्रसंग सांगत आजपर्यंत साथ दिलेल्या सर्वांचे आभार मानले. आपला हा प्रवास कोणाला तरी काही यशाच्या शिखरावर जाण्यासाठी प्रोत्साहन देइल आणि ताकद बनेल, अशी अपेक्षाही तिने व्यक्त केली. 1. तू आज यशाच्या शिखरावर पोहोचली आहेस. पण त्याची सुरुवात कशी झाली. पहिल्यांदा कॅमेºयासमोर जाण्याचा अनुभव कसा होता? पहिल्यांदा मी अतुल शिधये यांच्या कॅमेºयासमोर गेले. अगदी नवखी होते. आपण कसे दिसतो, फीचर्स कसे आहे? अगदी काही कल्पना नव्हती. पण, अतुल यांनी माझे अत्यंत सुंदर फोटो काढले. परिचितांना हे फोटो दाखविले. त्यातूनच मला काम मिळत गेले. करिअरच्या सुरुवातीला अतुल सरांनी मला खूप मदत केली.2. नच बलिए, झलक दिखला जा या सुपहरहिट शो मधून तुझ्यातील डान्सर खºया अर्थाने पुढे आली. त्याबाबतच्या काही आठवणी? - या शोमध्ये रणबीर कपूर, फराह खान, रेमो फर्नांडिस आले होते. आमच्या डान्सचे कौतुक झालेच पण चांगले गुणही मिळाले. परीक्षक आणि प्रेक्षकांच्या नजरेत जागा मिळविणे, हेच माझ्यासाठी खूप आनंदाचे क्षण होते. ‘आजपर्यंतचा उत्कृष्ठ परफॉर्मन्स’ अशी रणबीरची कॉमेंट तर माझ्यासाठी मर्मबंधातील ठेव ठरली. रेमो फर्नांडिसनी माझ्या एक्सप्रेशनचे कौतुक केले. फराह खान म्हणाल्या, ‘तुझ्यासारखी डान्सर मी पाहिलेली नाही.’ तो सगळा काळच भारावलेला होता. ही सगळीच मंडळी माझ्यासाठी नेहमीच स्पेशल ठरली आहे. जिंकणं हा एक अत्यंत छोटा क्षण असतो. परंतु, तिथपर्यंत पोहोचण्याचे हे जे क्षण आहेत ना, ते खूप महत्त्वाचे असतात. या दोन्ही कार्यक्रमांनी मला जे दिले ते शब्दांत वर्णन करण्यासारखे नाही.3. तुझ्या आयुष्यातील काही अविस्मरणीय क्षण? - ‘नटरंग’ मधील ‘वाजले की बारा’ गाण्याने मला डान्सर म्हणून वेगळी ओळख मिळवून दिली. ‘ नच बलिए’ माझ्या करियरचा महत्वाचा टप्पा आहे. ‘ कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटासाठी मिळालेला पुरस्कार तर खूपच महत्वाचा आहे. मला नेहमीच असे वाटायचे, की एक पुरस्कार मिळावा आणि तो मी माझ्या आईला अर्पण करावा. या चित्रपटाच्या निमित्ताने माझी ही इच्छा पूर्ण झाली.4. आज तू अनेकांची आयडल बनली आहेस. पण तुझे आयडल कोण आहेत? - ग्लोबल फिगर म्हणाल, तर प्रियंका चोप्रा. पण, माधुरी दीक्षित नेहमीच डान्सबाबतीत माझी आयडल राहिली आहे. अभिनयासाठी काजल. जिद्द म्हणजे काय असते आणि एखादी मुलगी काय करून दाखवू शकते, याचे उदाहरण प्रियांका चोप्राने घालून दिले आहे. त्यामुळे ती नेहमीच माझ्यासाठी एक आदर्श व्यक्तिमत्त्व राहील.5. करिअरच्या या यशस्वी वाटचालीत ‘सीएनएक्स’च्या माध्यमातून तुला कोणाला ‘थॅँक्स’ म्हणायल आवडेल? - आईने मला नेहमीच पाठिंबा दिला आहे. पण आमचे नातेच असे आहे की रोज झोपेतून उठून मी तिला थँक्स नाही म्हणू शकत. पण, या संधीचा फायदा घेऊन मी, माझी मित्रमंडळी तसेच पुण्यात मी श्रीगोपाल विहारमध्ये राहते त्या कॉलनीतल्या सर्वांना थँक्स म्हणायची संधी घेते. या कॉलनीमध्ये राहत असताना, विविध कार्यक्रमांत सहभागी होत असतानाच मला त्यांच्यामुळे समजले की मी चांगली नाचू शकते. त्यांनी मला प्रोत्साहन दिलं. पाचवी-सहावीला असताना मी डान्सला सुरूवात केली. गणपतीच्या काळात पहिल्यांदा सतरंजीवर डान्स केला. माधुरी दीक्षितच्या ‘आँखियां मिलाऊं कभी आँखियां चुराऊं’ या गाण्यावर मी डान्स केला होता. संपूर्ण कॉलनीतील लोक मला ‘एमडी’ म्हणायचे. त्यांनी दिलेल्या हुरूप व प्रोत्साहनामुळेच मी येथे पोहोचले आहे. कॉलेजमध्ये गायकवाड मॅडमनेही मला खूप मदत केली. माझ्यातील नृत्यकलेला प्रोत्साहन दिले. या सर्वांना मी मनापासून थँक्स म्हणू इच्छिते. वाजले की बाराडान्स परफॉर्मन्स कुठेही असो, वाजले की बारा हे गाणे लागले, की मी या गाण्यावर एकदा नाही तर दोनदा नाचते. तसेच, माझी जी सिग्नेचर स्टेप आहे त्यावर मी फुल जल्लोष करते. त्या वेळचा जो प्रेक्षकांचा रिस्पॉन्स असतो ना, तो खरंच सुंदर असतो. महाराष्ट्रातून मिळालेली ही दाद ना मला लय भारी वाटते. लेडी रणवीर सिंगरणवीर सिंग म्हणजे उर्जेचा अखंड झरा. ‘कम्प्लिट हाय एनर्जी पॅकेज’. तो नेहमीच म्हणतो, हे करू या-ते करू या. तो म्हणजे एक तुफान आहे. मी अगदी त्याच्यासारखीच आहे. मला सतत काही ना काही करायचे असते. म्हणूनच माझी मैत्रीण क्रांती रेडेकर मला नेहमीच लेडी रणवीर सिंग म्हणते.