Join us

'तुझं माझं जमतंय' मालिकेतील आशुचा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते झाले फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 14:55 IST

अभिनेत्री मोनिका बागुल हिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. साधी सालस आशु प्रेक्षकांना भावली आहे.

'तुझं माझं जमतंय' हि मालिका प्रेक्षकांच्या भरलीच पसंतीस पडली आहे. अश्विनी, शुभंकर यांना एकत्र आणण्यासाठी मालिकेत दिलेला पम्मीचा तडका, आणि त्यांचं त्रिकुट हे प्रेक्षकांचं भरगोस मनोरंजन करतंय. अपूर्वा नेमळेकरने या मालिकेतून टीव्ही माध्यमात पुनरागमन केलं त्यामुळे तिला पुन्हा एकदा टीव्हीवर पाहायला मिळतंय याचा आनंद प्रेक्षकांना आहे. अपूर्वा सोबतच रोशन विचारे आणि मोनिका बागुल या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. या मालिकेचं शूटिंग नगरमध्ये चालू आहे.

मालिकेतील आशु म्हणजेच अभिनेत्री मोनिका बागुल हिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. साधी सालस आशु प्रेक्षकांना भावली आहे. मोनिका ही मूळची नगरचीच आहे.

 

 

खऱ्या आयुष्यात देखील मोनिका ही थोडीफार आशु सारखीच आहे पण नुकतंच तिने सोशल मीडियावर वेस्टर्न आऊटफिट मधले फोटोज तिच्या चाहत्यांसाठी शेअर केले आणि मोनिकाला ग्लॅमरस अंदाजात पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. तिच्या या फोटोजवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे मोनिकाचा हा फोटो काहीसा वेगळा ठरतो आहे.तसेच आपल्या ग्लॅमरस लूकमुळेही ती कायम चर्चेत असते. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते. सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील. सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत.