Exclusive: झी मराठीवरील ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, या दिवशी टेलिकास्ट होणार अखेरचा एपिसोड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 06:00 AM2022-08-03T06:00:00+5:302022-08-03T06:00:02+5:30

झी मराठी (Zee Marathi)वरील एक मालिका लवकरच एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याजागी आता नवी मालिका सुरु होणार आहे.

Tuzya Mazya Sansarala Ani Kay Hava serial on serial on Zee Marathi will go off air | Exclusive: झी मराठीवरील ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, या दिवशी टेलिकास्ट होणार अखेरचा एपिसोड

Exclusive: झी मराठीवरील ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, या दिवशी टेलिकास्ट होणार अखेरचा एपिसोड

googlenewsNext

झी मराठी (Zee Marathi)वरील प्रत्येक मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे. झी मराठीवर (Zee Marathi)  अनेक नव्या मालिका सुरू होणार आहेत. पण मालिका आता अखेरच्या टप्प्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे लवकरच एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. झी मराठी वाहिनीने नुकतीच त्यांच्या सोशल मिडियावरुन नव्या मालिकेची घोषणा केली. नव गडी नवं राज्य मालिकेचा प्रोमो ही रिलीज झाला आहे.

नवी मालिका येणार म्हटलं की तीची वेळ काय असेल, कोणत्या मालिकेच्या जागी ही मालिका येईल अर्थात कोणती मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असे एक ना अनेक प्रश्न पडतात.

लोकमत फिल्मीच्या माहितीनुसार अदिती आणि सिद्धार्थची तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याजागी अनिता दाते, पल्लवी पाटील आणि कश्यप परुळेकर यांची नव गडी नवं राज्य ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  येत्या ६ ऑगस्टला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. 


नव गडी नवं राज्य या मालिकेत पल्लवी पाटील आनंदीच्या भूमिकेत दिसणार असून, अनिता दाते रमाच्या भूमिकेत व रमाच्या मुलीच्या भूमिकेत सायशा भोईर दिसणार आहे. अभिनेता कश्यप परुळेकर देखील या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत दिसेल. या मालिकेचा प्रोमो रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. 

Web Title: Tuzya Mazya Sansarala Ani Kay Hava serial on serial on Zee Marathi will go off air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.