झी मराठी (Zee Marathi)वरील लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला' (Tuzyat Jeev Rangala)मधून राणादा आणि पाठकबाईंची जोडी हिट ठरली होती. त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावली होती. आता हे रिल लाइफमधील कपल रिअल लाइफमध्ये लग्न करणार आहेत. काही महिन्यांपूर्वी हार्दिक जोशी (Hardik Joshi) आणि अक्षया देवधर (Akshaya Deodhar) यांचा साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याचे फोटो सर्वत्र व्हायरल झाले होते. आता त्यांच्या लगीनघाईला सुरूवात झाल्याचे समजते आहे. हार्दिकचं केळवण पार पडले आहे आणि हार्दिकनं फोटो शेअर करून याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे.
हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत. मात्र अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख समोर आलेली नाही. पण त्यांच्या लगीनघाईला सुरुवात झाल्याचे समोर आले आहे. हार्दिकचे केळवण नुकतेच पार पडले असून याबद्दल फोटो शेअर करून त्याने चाहत्यांना माहिती दिली आहे. हार्दीकचं केळवण बहिणीकडे साग्रसंगीत पद्धतीनं पार पडलं आहे. केळीच्या पानावर अस्सल महाराष्ट्रीय पद्धतीनं हार्दीकनं केळवणाचा आस्वाद घेतलाय.
'बहिणीकडून केळवणाची सुरूवात', असं म्हणत हार्दीकनं सुंदर फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये हार्दिक कुर्त्यात दिसतोय. आता लग्नाची तारीख कळवा..अशी कमेंट हार्दिकच्या फोटोवर चाहत्याने केली आहे.
हार्दिक बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चेने जोरदार चर्चा. तसेच हे कपल या वर्षात लग्न करणार आहेत, असे सुद्धा सांगितले जात आहे. त्यामुळे आता हार्दिक नेमका बिग बॉसमध्ये जाणार का हे लवकरच समजेल.