Join us

टीव्ही अभिनेता आमीर अलीने रस्त्यावर रात्र काढून साजरा केला वाढदिवस, पहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2017 4:36 PM

टीव्ही अभिनेता आमीर अली त्यास अपवाद आहे. त्याने त्याचा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा केला की, ऐकूण तुम्ही दंग रहाल. त्याने त्याचा वाढदिवस चक्क रस्त्यावर रात्र काढून साजरा केला.

कुठलीही व्यक्ती तिचा वाढदिवस अधिक अविस्मरणीय व्हावा याकरिता काहीतरी हटके प्लॅन करीत असतो. कारण वाढदिवसाच्या पार्टीत जो कोणी सहभागी होईल त्याला तो वाढदिवस कायमस्वरूपी स्मरणात राहावा, हा त्यामागील प्रमुख उद्देश असतो. मात्र टीव्ही अभिनेता आमीर अली त्यास अपवाद आहे. त्याने त्याचा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा केला की, ऐकूण तुम्ही दंग रहाल. त्याने त्याचा वाढदिवस चक्क रस्त्यावर रात्र काढून साजरा केला. आता तुम्ही असा विचार करीत असाल की, त्याने असे का केले असावे? तर आमीर अली सध्या हज यात्रेला गेला असून, त्याला रात्र रस्त्यावर झोपून काढावी लागली. अलीने याबाबतची माहिती ट्विट करून दिली आहे. ज्यामध्ये त्याने म्हटले की, ‘अशापद्धतीने मी माझा जन्मदिवस साजरा केला. रस्त्यावर झोपून आणि रात्रभर चालत होतो. हा एक खूपच अविस्मरणीय असा अनुभव आहे. मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाºयांचे आभार.’ आमीर अलीच्या या व्हिडीओमध्ये हज यात्री चालताना बघावयास मिळतात. पांढºया पोशाखात असलेल्या हज यात्रींसोबत आमीरही दिसत आहे. आमीर अली गेल्या ३० तारखेच्या आसपास हज यात्रेला गेला. याबाबतची माहिती त्याने ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांना दिली. काही दिवसांपूर्वी केलेल्या ट्विटमध्ये त्याने म्हटले होते की, ‘हज यात्रेला निघण्याअगोदर मी आताच असे ऐकले की, जवळपास ६० लाख लोक या यात्रेत सहभागी होणार आहेत.’ असो, आमीर अली याला ‘सीएनएक्स मस्ती’कडून वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा. त्याचबरोबर त्याची यात्रा यशस्वी होवो, हीच शुभकामना!