Karan Tacker : वेळेचा काही भरोसा नाही कधी कोणावर कोणती वेळ ओढावेल सांगता येत नाही. त्यातच आर्थिक मंदीचा फटका केवळ सामान्यांनाच नाही तर सेलिब्रिटींनाही बसतो. टीव्ही अभिनेता करण टॅकरने त्याच्या कठीण काळाबाबत पहिल्यांदाच भाष्य केले आहे. व्यवसाय ठप्प, घरंही गेलं यातून अभिनेत्याने कशी उभारी घेतली हे त्याने सांगितले आहे.
करण टॅकर हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. 'एक हजारो मे मेरी बहना है' या मालिकेतून तो घराघरात पोहोचला. तसेच त्याने अनेक कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनही केले आहे. करणने त्याच्या वाईट काळाबद्दल खुलासा करताना सांगितले,'मी माझ्या वडिलांसोबत बिझनेस करत होतो. २००८ मध्ये आलेल्या आर्थिक मंदीचा फटका आमच्या बिझनेसला बसला. कुटुंबाचं पालनपोषण करणं कठीण झालं होतं.तेव्हा मी नोकरी शोधायला सुरुवात केली. माझं जितकं शिक्षण झालं होतं त्यानुसार मला तेव्हा २५ हजार महिना मिळत होता. मात्र यातून कर्ज फेडता येणार नव्हतं.'
करण पुढे म्हणाला,'मी शेअर्स विकले तेही नुकसानीत.कपड्यांची काही स्टोअर्स होती जे मी बंद केली. मला आठवतं मी सगळे स्टॉक विकले. विक्री सुद्धा बंद केली होती.कारण स्टॉक ठेवण्यासाठी माझ्याकडे जागाही नव्हती. मी घरही सोडले. एक घ्या ६ मोफत मिळवा अशा ऑफर मध्ये मी स्टॉक्सची विक्री केली.'
घर चालवण्यासाठी आणि कर्ज फेडण्यासाठी मी जास्त पगाराच्या नोकरीच्या शोधात होतो.एका एअरलाईन्स मध्ये मी पर्सरचे काम केले जिथे महिन्याला दिड लाख मिळत होते . मला तेव्हा पैशांची गरज होतीच. नंतर मला एका क्रीमच्या ब्रॅंडची जाहिरात मिळाली. यातून मला खूप पैसे मिळाले. १२ वर्षांपूर्वी २२ दिवसांसाठी मला ३ लाख रुपये मिळाले होते.तेव्हाच मी ठरवले आणि वडिलांना सांगितले की मी याच क्षेत्रात काम करणार कारण हेच क्षेत्र आपल्याला नुकसानीतून बाहेर काढू शकतं.'