मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेते ललित मनचंदा (lalit manchanda) यांनी मेरठ येथील त्यांच्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने सर्वांना धक्का बसला आहे. ३६ वर्षीय ललित यांनी काही हिंदी चित्रपट आणि टेलिव्हिजन मालिकांमध्ये लहान भूमिका साकारल्या होत्या. सध्या ते एका नवीन वेबसीरिजचं शूटिंगही करत होते. परंतु त्यांनी आत्महत्या करुन टोकाचं पाऊल उचललं आहे. त्यांच्या आत्महत्येचं धक्कादायक कारण समोर आलं आहे.
म्हणून ललित यांनी केली आत्महत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या ठिकाणी कोणताही सुसाइड नोट आढळलेली नाही. तथापि ललित यांचे कुटुंबीय आणि मित्रांनी सांगितले की, ललित काही काळापासून मानसिक तणाव आणि आर्थिक समस्यांमुळे त्रस्त होते. त्यांच्या निधनामुळे चाहत्यांमध्ये आणि सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. ललित यांनी काही महिन्यांपूर्वी 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेत अभिनय केला होता.
ही दु:खद घटना मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधते. मानसिक तणाव आणि नैराश्याने ग्रस्त व्यक्तींना वेळेवर मदत आणि आधार मिळणे किती आवश्यक आहे, ही गोष्ट यामुळे पुन्हा नमूद होते. सध्या पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहे. सध्या ललित यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.