दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात...ती त्याला धोका देते आणि तो उन्मळून पडतो... हे सगळे पडद्यावर तुम्ही पाहिले असेलच. तुमच्या आमच्या आजुबाजूलाही अशाच घटना घडतात. एका अभिनेत्यासोबतही रिअल लाईफमध्ये असेच काही घडले. त्याने इन्स्टाग्रामवर हा सगळा किस्सा शेअर केला. आपल्या पोस्टमध्ये एक्स-गर्लफ्रेन्डचा फोटोही शेअर केला. अर्थात काही तासांनंतर त्याने ही पोस्ट डिलीट केली. पण तोपर्यंत त्याच्या ‘प्यार और धोखा’ची रिअल लाईफ स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
हा अभिनेता कोण तर टीव्ही अॅक्टर मोहित अबरोल. प्रेमात मिळालेल्या धोक्याची कहाणी त्याने सोशल मीडियावर शेअर केली. मोहितने 2016 मध्ये अभिनेत्री मानसी श्रीवास्तवसोबत साखरपुडा केला होता. अर्थात काही महिन्यांआधी हा साखरपुडा तुटला. हा साखरपुडा तुटण्याचे कारण मोहितने सांगितले.
बालिका वधू, रजिया सुल्तान, प्यार कोई हो जाए, तुम साथ हो जां, एमटीवी फनाह, मेरी आशिकी तुम से ही, स्वरागिनी , गंगा, कवच ... काली शक्तिमान से आणि पोरस अशा अनेक मालिकांमध्ये मोहितने काम केले आहे.
मोहितने लिहिले,‘मी तिला पुन्हा भेटू इच्छितो होतो. माझ्याकडून तिला अलविदा म्हणण्यासाठी. तुम्ही ज्या व्यक्तिवर जीवापाड प्रेम करता, त्याला निरोप देणे सोपे नसते. हे काहीसे आपल्या शरीराचा एक भाग कापून दूर फेकण्यासारखे आहे. पण मी समाधानी आहे की, तू निघून गेलीस. मी तुझ्यावर खरे प्रेम केले. माझे प्रेम निरंतर होते. पण काहीही कायमस्वरूपी नसते, हे मला समजले. हा शुद्ध खोटेपणा आहे. तू माझ्यासोबत साखरपुडा केला. तू हे सगळे एकदा नाही तर अनेकदा केले, याचे सर्वाधिक दु:ख होते. फक्त माझ्यासोबत जे काही केलेस ते तुझ्या नव्या प्रियकरासोबत करू नकोस. 8 वर्षे तू माझ्या सोबत होतीस. मी तुला जीवापाड जपले. तुझा सगळा खर्च उचलला. मी माझ्या करिअरचीही पर्वा केली नाही. प्रकृतीही चिंता केली नाही. अरहानसोबत तुझे अफेअर सुरु झाले तेव्हा मी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. आयसीयूमध्ये 3 दिवसानंतर शुद्ध आली, तेव्हाही तू तिथे नव्हती. तुझी जेव्हाकेव्हा गरज होती, तेव्हा तू नव्हतीच. पण अरहानने तुला सोडल्यावर तू पुन्हा माझ्याकडे परतण्याचे प्रयत्न करू लागलीस. तू माझे आयुष्य नरक बनवून सोडले. मी शेवटपर्यंत तुला स्वीकारत राहिलो. तू सुधारली असशील, या भावनेने. पण मी चूक होतो. मी तुला पुन्हा स्वीकारले, त्या क्षणाचा पश्चाताप होतोय. तू इतके काही करूनही आज मी जिवंत आहे. पण जो जे करतो, ते भोगतो. आत्ता नाही कदाचित पुढे. तोपर्यंत तू तुझ्या नव्या प्रियकरासोबत मौजमज्जा कर. शुभेच्छा मानसी. कृपा करून त्याचा वापर करू नकोस. मुला, तूही स्वत:चा वापर होऊ देऊ नकोस.’