Join us

अभिनेता मोहित मलिक आणि अदितीच्या घरी लग्नानंतर 10 वर्षांनी हलणार पाळणा, इमोशनल पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

By गीतांजली | Published: December 22, 2020 5:30 PM

टीव्ही अभिनेता मोहित मलिकच्या घरातही लवकरच नवा पाहुणा येणार आहे.

वर्ष 2020च्या शेवटी अनेक सेलिब्रिटी चाहत्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आले आहेत. करणवीर बोहार आणि टीजे सिद्धू सोमवारी पुन्हा एकदा आई-बाब झाले. तर टीव्ही अभिनेता मोहित मलिकच्या घरातही लवकरच नवा पाहुणा येणार आहे. त्याची पत्नी आदिती शिवारिकर प्रेग्नेंट आहे. लग्नाला 10 वर्षानंतर हे कपल पेरेंट्स बनण्याची तयारी करत आहेत. 

नवीन वर्ष मोहित आणि आदितीसाठी आनंद घेऊन येणार आहे. पुढच्या वर्षी 2021च्या मे महिन्यात आदित बाळाला जन्म देणार आहे. 'बॉम्बे टाईम्स' शी बोलताना मोहित म्हणाला की, ही चांगली बातमी ऐकताच तो आकाशात पोहोचला होता. मोहित म्हणतो की, त्या दिवशी तो शूटिंग करत होता, जेव्हा अदितीने त्याला फोन करून सांगितले की ती प्रेग्नेंट आहे.

आदितीचा फोन आल्यावर मोहित टेन्शनमध्ये आला होतामोहित म्हणतो, 'मी शूटिंग करत होतो. आदितीचा अचानक फोन आला आणि तिने ही चांगली बातमी दिली.  ती जे म्हणाली हे ऐकून मी टेन्शनमध्ये आलो होते. अदिती म्हणाली, रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहे, तेव्हा सगळीकडे कोरोनाचे वातावरण म्हणून मला वाटले की ती, कोविड -19च्या टेस्टबद्दल बोलते आहे. पण मग ती हसली आणि सांगितले की आपण पेरेंट्स बनणार आहोत. माझा यावर विश्वास बसत नव्हता आणि मी दोन दिवस तिला पुन्हा-पुन्हा हेच सांगत होतो की, पुन्हा चेक कर. 

सोशल मीडियावर दिली गुडन्यूज मोहितने आदितीबरोबर फोटो सोशल मीडियावरही शेअर केला आणि ही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली. मोहितने या फोटोसोबत लिहिले की, 'ज्या पद्धतीने मी तुझ्यावर हात ठेवला आहे ... मला धन्यवाद म्हणायचे आहे ... आम्हाला निवडल्याबद्दल. ज्या अनुभवातून आम्ही जातोय त्यासाठी देवा तुझे आभार मानतो. थॅंक्यू थॅंक्यू थॅंक्यू.आता दोनचे  तीन होणार आहोत. 

'मिली'च्या सेटवर झाली होती पहिली भेटमोहित आणि आदितीची पहिली भेट टीव्ही सीरियल 'मिली' च्या सेटवर होती. 1 एप्रिल 2006 रोजी मोहितने आदितीला प्रपोज केले, त्यानंतर 4 वर्षांच्या डेटिंगनंतर 1 डिसेंबर 2010 रोजी त्यांचे लग्न झाले. 

टॅग्स :टिव्ही कलाकार