Join us

धक्कादायक पत्नीसह कोरोनाकाळात व्हॅकेशनसाठी मालदीव्हज गेला अभिनेता,एकटीच परतली पत्नी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 14:31 IST

घरीच राहा सुरक्षित राहा हा नारा सध्या सेलिब्रेटी देत असले तरी काही मात्र बिनधास्त कोरोना नसल्याप्रमाणे फिरताना दिसत आहेत.

सध्या सर्वत्रच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वेळीच आळा बसावा परिस्थीती अजून गंभीर होऊ नये म्हणून सारेच युद्धपातळीवर कोरोनाचा नायनाट व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत.वेळोवेळी हात धुवा, मास्क वापरा, सॅनिटाईज करा असे जनेतला आवाहन केले जात आहे. दिवसेंदिवस कोरोनामुळे परिस्थिती आणखी खराब होतान दिसत आहे.  सा-यांचेच कोरोनाने कंबरडे मोडले असताना काही लोक अतिशय बेजबाबदारपणे वागत असल्याचे पाहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून व्हॅकेशनच्या नावावर सर्वच सेलिब्रेटी मालदीव्हजला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. रोज कोणता ना कोणता सेलिब्रेटी कोरोनाकाळातही व्हॅकेशन एन्जय करण्यासाठी जातो. घरीच राहा सुरक्षित राहा हा नारा सध्या सेलिब्रेटी देत असले तरी काही मात्र बिनधास्त कोरोना नसल्याप्रमाणे फिरताना दिसत आहेत.मात्र कधी काय होईल हे सांगता येत नाही.

टीव्ही अभिनेता नमिश तनेजादेखील पत्नीसह मालदीव्हजला गेला आणि तिथेच अडकला. 'ए मेरे हमसफर' मालिकेत नमिश मुख्य भूमिका साकारत आहे. मालदीवला सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी तो गेला आणि तिथेच त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे तो मालदीव्हजमध्येच त्याला थांबावे लागले.  

नमिश त्याच्या पत्नीसोबत काही दिवसांतच पुन्हा भारतात परतणार होता. मात्र कोरोना टेस्ट पॉझीटीव्ह आल्यानंतर त्यांच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय नव्हता.  शेवटी पती नमिशला सोडून पत्नीला एकटीलाच भारतात परतावं लागलं आहे.

 

 

सध्या नमिशला तिथल्याच एका रिसॉर्टमध्ये आयसोलेट करण्यात आलं आहे. त्याच्या पत्नीची चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे तिला भारतात परत पाठवण्यात आलं आहे. पतीला अशा गंभीर परिस्थिती एकट्याला सोडून येण्याची पत्नीची अजिबात  ईच्छा नव्हती. नमिशने खूप समजूत काढल्यानंतरच ती भारतात येण्यास तयार झाली. 

या संपूर्ण गोष्टीची माहिती स्वतः नमिशने इन्स्टाग्राम अकाउंटवर दिली आहे. इतकंच काय तर कोरोना हा सर्वत्रच आहे. तो झपाट्याने पसतोय, कधीही कुठेही कुणालाही याची लागण होऊ शकते. भारत सोडला तर दुसरा कोणताच देश सुरक्षित नसल्याचेही त्याने म्हटले आहे. नमिशबरोबर घडलेला या भयावय अनुभवातून तरी इतरही बोध घेतील आणि घरीच सुरक्षित राहतील हीच काय ती अपेक्षा.

टॅग्स :नमिश तनेजा