Join us

'क्योंकि' मधल्या या अभिनेत्याने घटस्फोटाचा अर्ज घेतला मागे, हे आहे या मागचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 17:38 IST

क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेद्वारे त्यांने आपल्या करिअरची सुरुवात केली.

क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेद्वारे त्यांने आपल्या करिअरची सुरुवात केली. खरे तर इंडियन आयडल या कार्यक्रमात तो झळकला होता. त्याच्या आवाजाचे सगळ्यांनी कौतुक देखील केले होते. पण त्याला क्योंकीमध्ये काम करायची संधी मिळाली आणि तो अभिनयक्षेत्राकडे वळला. आम्ही बोलतोय अमित टंडनबदल.  अमितने दिल मिल गये, जिनी और जुजू यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून अमित आणि त्यांची पत्नी रुबी टंडन यांच्यामध्ये घटस्फोटाची चर्चा रंगली होती. दोघांच्या नात्यामध्ये तणाव होत्या त्यामुळे त्यांनी एकमेकांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. दोन वर्षांपूर्वी दोघांनी घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनी तो सामंजस्याने मागे घेऊन परत एकत्र येण्याचे निर्णय घेतला आहे.   

 इंडियाच्या रिपोर्टनुसार अमितने एका मुलाखती दरम्यान सांगितले की, आपल्याला वाटतंय की मुलं एडजस्ट करुन घेतली मात्र आपल्याला या गोष्टीच भान नाही राहत की मुलांवर या गोष्टीचा खूप परिणाम होतो. हो पण, मला हे देखील मान्य आहे की जर कपल एकमेकांसोबत खुश नसतील तर त्यांना वेगळं होण्याचा पूर्ण अधिकार आहे.   

 अमितने रूबीसोबत 2007मध्ये लग्न केले. त्या दोघांची ओळख सोशल नेटवर्किंगद्वारे झाली होती. त्यावेळी अमित मुंबईत तर रुबी शिकागोमध्ये राहात होते. पहिल्याच भेटीनंतर काहीच दिवसांत त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नाला 2017मध्ये दहा वर्षं पूर्ण झाली होती आणि त्याचवर्षी त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. 

टॅग्स :अमित टंडन