प्रत्येक कलाकाराला स्टारडम हे हवं असतं त्याशिवाय त्यांची गाडी झगमगत्या महामार्गावर सुसाट धावूच शकत नाही.....किती तरी येतात. आणि जातात...पण स्टारडम मिळवणं हे खूपचं कठीण असतं....मात्र लाईमलाइटमध्ये येण्यासाठी काही कलाकार अनेक ना- ना त-हा शोधत असतात. असेच काहीसे टीव्ही अभिनेत्री अबिगैल पांडेने केले आहे. ती इतर अभिनेत्रीप्रमाणे फिटनेस फ्रिक आहे. मात्र फिटनेसच्या नावाखाली तिने सगळ्या सीमा पार केल्या आहेत. सोशल मीडियावर तिने योगा करतानाचा फोटो शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोत ती टॉपलेस असून अशाच अवस्थेत योगा करत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे तिने शेअर केलेल्या फोटोला कॅप्शनही दिले आहे. आपल्याला सगळं काही मिळू शकतं पण मनाची शांती मिळण्यासाठी योगा हा उत्तम पर्याय असे तिने मात मांडले असून मनाची शांती मिळावी यासाठी सा-यांनाचा तिने योगा करण्याचा सल्लाही दिला आहे.
तसेच तिने पुढे सांगितले की, "न्यूड आणि योगा याचा परस्पर काही संबंध नाही पण, जे कोणी न्यूड होत योगा करतात त्यांचे जगच वेगळे होवू शकते. मला अशा प्रकारे योगा करण्याची थोडी भीती वाटत होती पण माझी मैत्रीण आशका गोराडिया, माझा फोटोग्राफर आणि बॉडीगार्डने मला योगामध्ये एक्सप्रिमेंट करण्याची हिंमत दिली. माझा हा फोटो पाहून ब-याच मुलींना मी हे काय करते असा प्रश्न पडेल? ब-याच जणांना आवडणारही नाही. मात्र लोक माझ्याविषयी काय विचार करतील या गोष्टीचा मी विचार न करणेच बरे असे मला वाटते. तुर्तास हे फोटो पाहून तिच्यावर नेटीझन्स संमिश्र प्रतिक्रीया देत असल्याचे पाहायला मिळत आहे.
अबिगैल पांडेचे कोरियोग्राफर सनम जौहरसह अफेअर सुरू असून दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात आहेत. तसेच तिचा बॉयफ्रेंड सनम मधुरिमा आणि विशाल या जोडीला 'नच बलिए'साठी कोरियोग्राफही करत आहे.