टीव्ही अभिनेत्री चाहत खन्ना (Chahatt Khanna) पुन्हा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. दोन घटस्फोट, जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर आता चाहतच्या आयुष्यात तिसऱ्यांदा प्रेम आलं आहे. चार वर्ष लहान अभिनेत्यासोबत चाहत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. दोन लग्न आणि घटस्फोटांचं दु:ख सहन करुन आता ती पुन्हा प्रेमात पडली आहे. कोण आहे तो अभिनेता?
चाहत खन्ना आता ३७ वर्षांची आहे. ती कधी वैयक्तिक आयुष्यातील चढ उतारांमुळे तर कधी ऊर्फी जावेदवर केलेल्या टीकेमुळे चर्चेत आली होती. आता मात्र तिच्या रिलेशनशिपची चर्चा आहे. माध्यम रिपोर्टनुसार, चाहत अभिनेता रोहन गंडोत्राला डेट करत आहे. रोहन तिच्याहून चार वर्षांनी लहान आहे. तसंच रोहनचं चाहत्यांच्या जुळ्या मुलींसोबत छान बाँडिंगही झालं आहे. इतकंच नाही तर दोघं सध्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा पसरली आहे. अद्याप यावर तिच्याकडून स्पष्टीकरण आलेलं नाही. दोघंही लग्न करणार असेही दावे रिपोर्ट्समध्ये करण्यात येत आहेत.
चाहत खन्ना टीव्ही वरील स्टार अभिनेत्री आहे. 'बडे अच्छे लगते है' मालिकेत तिने प्रियाच्या बहिणीच्या भूमिका साकारली होती. 2006 साली चाहते भरत नरसिंघानीसोबत लग्न केले. तेव्हा ती केवळ 20 वर्षांची होती. हे लग्न फार काळ टिकलं नाही आणि २००७ सालीच तिचा घटस्फोट झाला. नंतर 2013 साली तिने फरहान मिर्जासोबत दुसरं लग्न केलं. त्यांना जुळ्या मुली झाल्या. मात्र लग्नानंतर चाहतने कौटुंबिक हिंसाचार सहन केला. अखेर 2018 साली तिने घटस्फोट घेतला. आता पुन्हा एकदा तिने आयुष्यात प्रेमाला संधी दिली आहे.
रोहन गंडोत्राही टीव्ही अभिनेता आहे. 'करले तू भी मोहोब्बत', 'नागिन', 'दिल से दिल तक' यासारख्या अनेक मालिकांमध्ये साईड रोल्स केले आहेत. नुकताच तो 1962 या वेबसीरिजमध्येही दिसला.