Join us

ऑस्ट्रेलियामध्ये अडकलीय ही अभिनेत्री,पण भारतीय असल्यामुळे मिळते तिला अपमानास्पद वागणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 2:59 PM

लॉकडाऊनपूर्वीच चांदनी ऑस्ट्रेलियामध्ये गेली होती आणि तिथेच ती अडकून राहिली. दुस-या देशात राहण्याचा अनुभव सांगताना नक्कीच तिचाही थरकाप उडाला असणार...आणि चाहत्यांचा होतोय संताप....

लॉकडाऊनमुळे लोकं जिथे होते तिथेच अडकून राहिले होते. त्यामुळे अनेक गोष्टीचाही सामना त्यांना करावा लागला. लॉकडाऊन काळ काहींसाठी जीवघेणा ठरला तर काहींसाठी त्रासदायक असाच एक किस्सा टीव्ही अभिनेत्री चांदनी भगवानानी सांगितला आहे. कोरोना व्हायरसा वाढता प्रादुर्भाव पाहाता सर्वच देशात लॉकडाऊन जाहीर झाले. 

लॉकडाऊनपूर्वीच चांदनी ऑस्ट्रेलियामध्ये गेली होती आणि तिथेच ती अडकून राहिली. दुस-या देशात राहण्याचा अनुभव सांगताना नक्कीच तिचाही थरकाप उडाला असणार...आणि चाहत्यांचा होतोय संताप....आजही दुस-या देशांमध्ये भारतीयांना वर्णभेदाचा सामना करावा लागतो. चांदनीला आलेला अनुभव हीच गोष्ट अधोरेखीत करते.  

चांदनीने सांगितले की, ऑस्ट्रेलियामध्ये प्रवासादरम्यानचा किस्सा तिने सांगितला. तिला वाटले की तिने चुकीची बस पकडली आहे. तेच क्रॉसचेक करण्यासाठी तिने बस चालकाशी संपर्क साधला. परंतु त्याने मला काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तो ऑस्ट्रेलियन प्रवाश्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत होता. पण तिचे उत्तर देणे टाळत होता. हे लक्षात येताच  चांदनीने त्याला जाब विचारायला सुरूवात केली तर तो तिच्यावर ओरडून बोलायला लागला. मी भारतीय असल्यामुळे तो माझ्याकडे लक्ष देत नव्हता नंतर त्याने मला शिवीगाळ करत थेट बसमधून खाली उतरवलं.” त्यामुळे दुस-या देशांमध्ये भारतीयांचा स्ट्रगल अजून संपला नसल्याचंही तिनं म्हटलंय.

चांदनी भगवानानीने  ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेत तिने बाल कलाकाराची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने ‘अमिता का अमित’, ‘तुम्ही हो बंधु सखा तुम्ही’, ‘खिडकी’, ‘संतोषी माँ’ यांसारख्या काही मालिकांमध्ये काम केले. सध्या चांदनी  अभिनयाचा अभ्यास करण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये राहत आहे.