Join us

देबिनाने दिली गुडन्युज, पहिल्या प्रेग्नंसीवेळी झाली होती ट्रोल , दुसऱ्या वेळी आली 'ही अडचण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 2:24 PM

गुडन्युज मिळाल्यानंतर सोशल मीडियावरुन सेलिब्रिटी मित्र आणि फॅन्सकडून अभिनंदनाचा वर्षाव होतोय. याआधीही त्यांना एक मुलगी आहे.

टीव्ही अभिनेता गुरमित चौधरी आणि अभिनेत्री देबिना मुखर्जी हे कपल टेलिव्हिजनमध्ये चांगलेच प्रसिद्ध आहे. दोघांनीही मालिका, सीरीज मधून अभिनयाची छाप पाडली आहे. दोघेही आपल्या खाजगी आयुष्यातील अपडेट्स फॅन्स सोबत शेअर करत असतात. तर आणखी एक गुडन्युज या कपलने शेअर केली आहे. 

डेबिनाने आजच एका गोंडस परीला जन्म दिला आहे. त्यांचा अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन खास अंदाजात बातमी शेअर केली आहे. फोटोमध्ये गुरमित काळ्या सूटमध्ये दिसत असून त्याने डेबिनाला उचलून घेतले आहे. तर डेबिनाच्या हातात गुलाबी रंगाचे फुगे देखील दिसत आहेत. बाजुला 'इट्स अ गर्ल' लिहिले आहे.

गुडन्युज मिळाल्यानंतर सोशल मीडियावरुन सेलिब्रिटी मित्र आणि फॅन्सकडून अभिनंदनाचा वर्षाव होतोय. याआधीही त्यांना एक मुलगी आहे. डेबिनाने कॅप्शनमध्ये लिहिले, 'जगात आमच्या मुलीचे स्वागत आहे. पुन्हा एकदा आई बाबा झाल्याने आम्ही खूप आनंदी आहोत, आशा आहे आम्हाला प्रायव्हसी मिळेल कारण वेळेआधीच मुलीचा जन्म झाला आहे. तुमचा आशीर्वाद आणि प्रेम असेच सोबत राहू द्या.'

डेबिना ने पहिल्या डिलीव्हरीनंतर काही दिवसातच दुसऱ्या प्रेग्नंसीची घोषणा केली होती. डेबिनाच्या पहिल्या प्रेग्नंसीवेळी अनेक अडचणी आल्या होत्या. तरी तिने दुसरी प्रेग्नंसी स्वीकारली. यावेळी प्री मॅच्युअर डिलीव्हरीला डेबिनाला सामोरे जावे लागले. त्यांनी आज आपल्या दुसऱ्या मुलीचे स्वागत केले आहे.

टॅग्स :गुरमीत चौधरीप्रेग्नंसीसेलिब्रिटी