प्रेग्नंसीच्या काळात अनेक अभिनेत्री मराठी मनोरंजन विश्वातून ब्रेक घेतात. याशिवाय बाळाच्या जन्मानंतर अनेक अभिनेत्रींचं वजनही वाढलेलं दिसतं. त्यामुळे अभिनेत्रींना मनोरंजन विश्व सोडावंही लागतं. प्रेग्नंसीनंतर वाढलेलं वजन अभिनेत्रींच्या करिअरसाठी मोठा अडथळा ठरतो.अशातच टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जीने (debina bonnerjee) डिलिव्हरीनंतर वाढलेलं वजन कसं कमी केलं, याचा सोपा उपाय सर्वांना सांगितलाय. तुम्हीही जाणून घ्या
प्रेग्नंसीनंतर असं केलं देबिनाने वेट लॉस
प्रेग्नंसीनंतर वाढलेलं वजन कमी करण्यासाठी देबिनाला तिचा पती आणि अभिनेता गुरमीत चौधरीने खूप मदत केली. देबिनाची वेट लॉस जर्नी पुढीलप्रमाणे
- गरम पाण्यात थोडी हळद, काळी मिरी आणि लिंबू पिळून देबिना तिच्या दिवसाची सुरुवात हे पाणी पिऊन करते . त्यानंतर ती बटर कॉफी घेते. कॉफीमध्ये देबिना थोडंसं देशी तूप टाकते. यामुळे दिवसभर एनर्जी निर्माण होण्यास मदत होते.
- मुलीच्या जन्माआधीपासून देबिना ग्रीन ज्यूस प्यायची. या ज्यूसमध्ये ओवा, पुदीना, आलं आणि थोडंसं मीठ असायचं. याशिवाय नाश्त्याला अभिनेत्री २ अंडी किंवा मूगडाळीचा पराठा खायची. यामुळे दिवसाच्या सुरुवातीला तिला प्रोटीन मिळायचं.
- फळात गोडवा असल्याने ती फळं खाणं टाळायची. स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी ही दोनच फळं देबिना खाते. याशिवाय भात किंवा चपाती न खाता ती फक्त भाजी खाते. रात्री ७ वाजेपर्यंत देबिना जेवते. त्यानंतर मुलींसोबत ती ९.३० पर्यंत झोपायला जातो.
अशाप्रकारे देबिनाने तिने वजन कसं कमी केलं याचा उलगडा केला. मुलींच्या जन्मानंतर देबिनाने या उपायांनी तिचं १० किलो वजन कमी केलं. आता तिचं वजन ६० किलो आहे. देबिनाने सांगितलेला हा सोपा आणि घरगुती उपाय, प्रत्येक महिलेसाठी फायदेशीर आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. देबिनाने 'रामायण' मालिकेत सीतेची भूमिका साकारली होती. याच मालिकेत गुरमीत चौधरीने श्रीरामांची भूमिका साकारली होती. पुढे देबिना आणि गुरमीतने एकमेकांशी लग्न करण्याचा निर्ण घेतला.