'मधुबाला' फेम अभिनेत्री दृष्टी धामीने काही दिवसांपूर्वीच आई होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली. सोशल मीडियावरुन नवऱ्यासोबतचे फोटो शेअर करत दृष्टीने या गोड बातमीबाबत चाहत्यांना सांगतिलं होतं. लग्नानंतर ९ वर्षांनी दृष्टी गरोदर आहे. ३८व्या वर्षी ती गोंडस बाळाला जन्म देणार आहे. दृष्टीने तिच्या बेबी बंपचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. पण, हा बेबी बंप खोटा असल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होतं. या नेटकऱ्यांना अभिनेत्रीने चोख उत्तर दिलं आहे.
दृष्टीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये मॅटर्निटी फोटोशूट केल्याचं दिसत आहे. बेबी बंप फ्लाँट करत दृष्टीने फोटोसाठी पोझही दिल्या आहेत. हा व्हिडिओ शेअर करत तिने नेटकऱ्यांची बोलती बंद केली आहे. "माझं बेबी बंप हे फक्त जेवणामुळे वाढलेलं पोट नाही, याचा हा पुरावा...जे लोक मला विचारत होते...तुम्हाला दिसतंय का आता?" असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलं आहे. तिच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी तिला सपोर्ट केला आहे.
दृष्टी टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'गीत','मधुबाला','दिल मिल गए','परदेस मे है मेरा दिल' ,'एक था राजा एक थी रानी' या मालिकांमध्ये काम केले आहे. शिवाय तिने 'द एम्पायर','दुरंगा' या वेबसीरिजमध्येही भूमिका साकारली आहे. तिने २०१५ साली बिझनेसमन नीरज खेमकासोबत लग्नगाठ बांधली. आता लग्नानंतर ९ वर्षांनी आईबाबा होणार असल्यामुळे ते दोघेही आनंदी आहेत. ऑक्टोबर महिन्यात दृष्टी तिच्या प