Join us

लॉकडाउनमुळे का होईना या अभिनेत्रीच्या आईने तब्बल दोन वर्षांनी सोडला अबोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 11:13 AM

पॉर्न स्टारला डेट करत असल्याच्या वृत्तामुळे अभिनेत्रीच्या आईने तोडले होते संबंध

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अभिनेत्री माहिका शर्मा तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. तसेच ती तिच्या विधानांमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते. कॉमेडी शो एफआयआरमध्ये झळकलेली माहिका खूप चर्चेत आली होती जेव्हा तिने एडल्ट स्टार डॅनी डीसोबत काम करत असल्याची घोषणा केली होती. यामुळे तिच्या पर्सनल आयुष्यातही खूप मोठे वादळ आले होते. एडल्ड स्टारसोबत नाव जोडल्यामुळे तिची आई तिच्यावर खूप नाराज झाली होती. पण आता लॉकडाउनमध्ये ती व तिच्या आईमध्ये जवळीकता निर्माण झाली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, काही दिवसांपूर्वी माहिका यूकेला फिरायला गेली होती. पण कोरोना व्हायरसमुळे भारतात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आणि माहिका तिथेच अडकली. ही गोष्ट माहिकाच्या आईला कळताच त्यांना काळजी वाटू लागली. जवळपास दोन वर्षानंतर माहिकाच्या आईने तिला फोन केला असल्याचे समजते.

याबद्दल माहिकाने सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून आई आणि माझे अजिबात बोलणे झाले नव्हते. तिने मला सगळीकडे ब्लॉक केले होते. त्यामुळे मलाही तिच्याशी संपर्क साधता आला नाही. मी एडल्ट फिल्म स्टारला डेट करते असे तिला वाटले होते. पण मला फक्त त्याच्यासोबत चित्रपटात काम करायचे होते.

जेव्हा माझ्या आईला समजले की मी यूकेमध्ये अडकले आहे तेव्हा तिला माझी काळजी वाटू लागली. तिने मला फोन केला आणि फोनवर रडू लागली. तिला मला लवकरात लवकर भेटायचे आहे असे ती म्हणाली. मला फार आनंद होत आहे आता सगळे काही ठिक होईल.

टॅग्स :टिव्ही कलाकार