Join us  

आधी साखरपुडा मोडला, मग मिळालं खरं प्रेम; आता लग्नानंतर ३ वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 10:58 AM

'कुमकुम भाग्य' फेम श्रद्धा आर्याने दिली गुडन्यूज, अभिनेत्री लवकरच आई होणार

श्रद्धा आर्या हे हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय नाव आहे. 'मै लक्ष्मी तेरे आंगन की' मालिकेतून पदार्पण केलेल्या श्रद्धाने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. 'कुंडली भाग्य' या मालिकेमुळे श्रद्धा प्रसिद्धीझोतात आली. श्रद्धाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. नुकतंच श्रद्धाने तिच्या चाहत्यांबरोबर एक गुडन्यूज शेअर केली आहे.  

श्रद्धा लवकरच आई होणार आहे. लग्नानंतर ३ वर्षांनी श्रद्धाच्या घरी पाळणा हलणार आहे. श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. यामध्ये श्रद्धा आणि तिचा पती बीचवर दिसत आहेत. यामध्ये अभिनेत्रीचं प्रेग्नंन्सी किटही दिसत आहे. सोनोग्राफीचा फोटो तिने पोस्ट केला आहे. या व्हिडिओत श्रद्धाचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. "एका छोट्याशा चमत्काराची वाट पाहत आहोत", असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलं आहे. 

कुंडली भाग्य फेम श्रद्धा आर्या गरोदर असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासूनच रंगल्या होत्या. श्रद्धा प्रेग्नंन्ट असल्यामुळे तिने मीडियाला सेटवर येण्यासही बंदी घातली होती. तेव्हापासूनच तिच्या प्रेग्नंन्सीच्या चर्चा रंगल्या होत्या. आता अभिनेत्रीने व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांबरोबर ही गुडन्यूज शेअर केली आहे. 

श्रद्धाने 16 नोव्हेंबर 2021 रोजी राहुल नागलसोबत लग्न करत नव्याने आयुष्याला सुरुवात केली होती. राहुलबरोबर लग्न करण्याआधी श्रद्धाचा साखरपुडा मोडला होता. श्रद्धाचं एका बिझनेसमनसोबत लग्न ठरलं होतं. साखरपुडाही झाला होता. मात्र त्याने लग्नानंतर श्रद्धाला इंडस्ट्री सोडण्याची अट ठेवली होती जी तिने मान्य केली नाही. त्यानंतर श्रद्धाने राहुलशी लग्नगाठ बांधली. आता लग्नानंतर ३ वर्षांनी ते आईबाबा होणार आहेत. 

टॅग्स :टिव्ही कलाकारप्रेग्नंसीसेलिब्रिटी