Join us

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीने अंडरवॉटर हॉटेलमध्ये पतीसह केलं बर्थडे सेलिब्रेशन, शेअर केले खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 16:54 IST

अभिनेत्रीने तिच्या पतीसोबत अंडरवॉटर हॉटेलमध्ये बर्थडे सेलिब्रेशन केलं.

सोनारिका भदौरिया हा हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. 'देवों के देव महादेव' या मालिकेत पार्वती मातेची भूमिका साकारून ती घराघरात पोहोचली. याशिवाय अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. 'पृथ्वी वल्लभ-इतिहास भी रहस्य भी', 'दास्तान ए मोहब्बत सलीम अनारकली', 'इश्क में मरजावा' या मालिकांमध्ये तिने साकारलेल्या भूमिका गाजल्या. सोनारिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून ती चाहत्यांबरोबर अपडेट्स शेअर करत असते. 

नुकताच सोनारिकाचा वाढदिवस झाला. लग्नानंतर सोनारिकाचा हा पहिला वाढदिवस होता. ३ डिसेंबरला अभिनेत्रीने तिच्या पतीसोबत अंडरवॉटर हॉटेलमध्ये बर्थडे सेलिब्रेशन केलं. याचे फोटो तिने शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सोनारिका तिच्या पतीसोबत दिसत आहे. "लव्ह यू प्राणनाथ...तू प्रत्येक दिवसात मॅजिक आणतोस", असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. सोनारिकाच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 

सोनारिकाने १८ फेब्रुवारी २०२४ रोजी बॉयफ्रेंड विकास पराशरशी लग्न करत संसार थाटला. तिच्या शाहीविवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सोनारिकाने हिंदी आणि काही साऊथ सिनेमांमध्ये काम केलं आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रिटी