Join us

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, बॉयफ्रेंडबरोबर घेणार सात फेरे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2024 12:28 PM

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री अडकणार विवाहबंधनात, बॉयफ्रेंडबरोबर थाटणार संसार, साखरपुड्याचे फोटो व्हायरल

मनोरंजनविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. नुकतंच रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानीने लग्नाच्या बेडीत अडकत नवीन आयुष्याला सुरुवात केली. आता टीव्हीवरील आणखी एक अभिनेत्री बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. 'इश्कबाज' फेम सुरभी चंदनाची लगीनघाई सुरू आहे. सुरभी बॉयफ्रेंड करण शर्माबरोबर विवाहबंधनात अडकणार आहे. नुकताच त्यांचा साखरपुडाही पार पडला. याचे व्हिडिओ समोर आले आहेत. 

अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री सुरभी चंदनाने गुपचूप साखरपुडा केला आहे. सुरभी आणि करण शर्माच्या साखरपुडा सोहळ्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. साखरपुड्यासाठी सुरभीने काळ्या रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला होता. तर करणनेही तिला ट्विनिंग करत काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. एकमेकांना अंगठी घातल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा होता. त्यांच्या साखरपुडा सोहळ्यातील या खास क्षणांचा व्हिडिओ विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

सुरभी चंदना आणि करण शर्मा २ मार्चला विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. जयपूरमध्ये त्यांचं डेस्टिनेशन वेडिंग होणार आहे. सुरभीच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटोही व्हायरल झाले आहेत. तिच्या लग्नासाठी कलाविश्वातील सेलिब्रिटीही हजेरी लावणार आहेत.  

टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रेटी वेडिंग