Join us

टीव्ही इंडस्ट्रीत सनई चौघडे वाजणार! 'नागिन' फेम अभिनेत्रीच्या घरी लग्नाची लगबग सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 15:40 IST

दाक्षिणात्य पद्धतीने जवळच्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडणार आहे.

टीव्ही इंडस्ट्रीत लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. 'नागिन' फेम अभिनेत्री सुरभी ज्योती (Surbhi Jyoti)  लग्नबंधनात अडकणार आहे. लाँगटाईम बॉयफ्रेंड सुमित सुरीसोबत ती सातफेरे घेणार आहे. दाक्षिणात्य परंपरा आणि रितीरिवाजात जवळच्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडणार आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यातील तारीख निश्चित झाली आहे. 

सुरभि ज्योती ३५ व्या वर्षी नवरी होण्यास सज्ज आहे. माध्यम रिपोर्टनुसार, मार्च महिन्यात सुरभी आणि सुमीत लग्नबंधनात अडकतील. पाच दिवस हा ग्रँड लग्नसोहळा असणार आहे. सुरभीने आतापर्यंत आपलं रिलेशन सिक्रेटच ठेवलं होतं. अनेक वर्षांपासून ती सुमीत सुरीला डेट करत होती. एका इव्हेंटमध्ये त्यांची भेट झाली. सुमीत लाईमलाईटपासून दूरच असतो तर अभिनेत्री आता त्याच्यासोबत लग्नगाठ बांधण्यास सज्ज आहे. मार्चमध्ये ६ किंवा ७ तारखेला ते सातफेरे घेतील. तर त्याच्याआधी वेडिंग फंक्शन्सला सुरुवात होईल.

सुरभी एका मुलाखतीत म्हणाली होती की,'मला आयुष्यात जे हवे आहेत ते मी मिळवतेच. ती माझी निवड आहे. मी अभिनेत्री आहे आणि पब्लिक फिगर आहे पण माझ्या वैयक्तिक आयुष्याशी कोणाचंच देणंघेणं नसलं पाहिजे. सुरभीने 'कबुल है', 'नागिन', 'कोई लौट के आया है', 'इश्कबाज', 'प्यार तुने क्या किया' या मालिकांमध्ये झळकली आहे. तिला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. 

टॅग्स :टिव्ही कलाकारलग्ननागिन 3