लवकरच &TV टीव्हीवर 'हप्पू की अलटन पलटन'मध्ये आशना किशोर एक महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. यात ती आधुनिक आणि स्टाइलिश मुलीची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. बॉलिवूडच्या सर्वात फॅशनेबल अभिनेत्री करीना कपूर खान आणि आलिया भट्टपासून आशनाने प्रेरणा घेतली आहे. हप्पू की अलटन पलटन या मालिकेत हप्पू सिंग, त्याची पत्नी, आई आणि 9 मुले आहेत. आशना किशोरने यात हप्पू सिंगच्या सर्वात मोठ्या मुलीची कटोरीची भूमिका साकारणार आहे. तिला आपले हे नाव आवडत नसल्याने ती स्वतःला ‘केट’ म्हणवते.
आशना आपल्या भूमिकेबाबत सांगते, “ह्या मालेकेतील माझे पात्र आधुनिक आहे. कटोरीला बाहेरच्या लोकांच्या संपर्कात राहायला आणि त्यांच्याशी हिंदी मिश्रित इंग्रजीत बोलायला आवडते. कटोरीला तिच्या खऱ्या नावाने हाक मारलेली आवडत नाही त्यामुळे ती स्वतःला केट म्हणवते आणि प्रत्येकाने तिला ह्याच नावाने हाक मारावी असे तिला वाटते. फॅशन ट्रेंडनुसार, माझा लुक आलिया भट्ट प्रमाणे आधुनिक व ट्रेंडी आहे आणि माझी व्यक्तिरेखा के3जीच्या करीना कपूर खान पासून प्रेरित आहे. मी हिमानी शिवपुरी आणि योगेश त्रिपाठी यांच्याबरोबर चांगले काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे कारण मी लहानपणापासून चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये हिमानीजींना बघत बघत मोठी झाले आहे. हिमानीजी म्हणजे प्रतिभेचे पॉवरहाऊस आहेत आणि त्यांच्याकडून अभिनेत्री म्हणून शिकण्यासारखे बरेच काही आहे.
योगेश त्रिपाठींच्या बाबतीत बोलायचे झाले तर मी त्यांच्या मागील कार्यक्रमांमध्ये त्यांचे काम पाहिले आहे आणि मी खरोखरच त्यांच्यासोबत काम करण्याचा आनंद घेते आहे. ही माझी पहिली विनोदी मालिका आहे. मी ह्या मालिकेत योगेशजींच्या मुलीचे पात्र साकारल्याचा मला आनंद आहे. हप्पू की अलटन पलटन ही मालिका घरगुती वादविवादात अडकलेल्या हप्पू सिंगच्या आयुष्याभोवती फिरत राहते. त्यांची आई आणि पत्नी सतत भांडत असतात. कहर म्हणजे हप्पूला नऊ अतरंगी मुले आहेत जी सतत काही ना काही गडबड करीत असतात. हप्पूच्या पलटनने दररोज केलेल्या वेडेपणाला आणि भानगडींना प्रेक्षक साक्षी असतील.