'या' टीव्ही अभिनेत्रीने घटस्फोट देण्यासाठी मागितले 2 कोटी रू, सोशल मीडियावर लिहीले खुलं पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 06:30 AM2019-04-24T06:30:00+5:302019-04-24T06:30:00+5:30
जानेवारी 2013मध्ये विवियनने वाहबिजसह लग्न करत आपल्या आयुष्याची नवी सरूवात केली. त्यांच्या या निर्णयामुळे रसिकही खूप खूश होते.
छोट्या पडद्यावरील रसिकांची आवडती जोडी म्हणजे विवियन सेना आणि वाहबिज दोराबजी. 'प्यार की ये एक कहानी' या मालिकेतून ही जोडी घराघरात पोहचली. अल्पावधीतच हे दोघेही रसिकांचे लाडके बनले. मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानच विवियन आणि वाहबिज यांच्यात जवळीक वाढली. आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जानेवारी 2013मध्ये विवियनने वाहबिजसह लग्न करत आपल्या आयुष्याची नवी सरूवात केली. त्यांच्या या निर्णयामुळे रसिकही खूप खूश होते. मात्र रसिकांचा हा आनंद फार काळ टिकून राहिला नाही. कारण लग्नानंतर काही वर्षातच दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण झाल्यामुळे विवियन आणि वाहबिज यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. मात्र वाहबिजनेही घटस्फोट देण्याआधी चक्क 2 कोटी रू इतके पोटगी मागितली आहे.
सध्या वाहबिजला सोशल मीडियावर तिचे फॅन्सही तिच्या घटस्फोटाविषयी प्रश्न वितारताना दिसतायेत. यावर उत्तर देताना तिने म्हटले की, ''माझे आयुष्य हे काही सर्कस नाही. सेलिब्रेटीही आधी माणूस असतो. त्यालाही भावना असतात. सतत हसतमुख दिसत असली म्हणून मला वेदना होत नाहीत असे होत नाही. अशा शब्दांत वाहबिजने सोशल मीडियावर चाहत्यांना शाब्दीक फटकार दिला आहे.
विवियनला टीव्हीचा शाहरूख म्हणून ओळखले जाते. इतकेच नव्हतर एशियातील सुपर सेक्सी मॅनचे नाव यादीत विविय टॉप 10 च्या यादीत सामिल होते. विवियनने आपल्या करिअरची सुरूवात एकता कपूरच्या 'कसम से' मालिकेतून केली होती. विवियनने इंजीनियरिंग केले आहे. तरीही अभिनेता बनण्याचे स्पप्न त्याने पाहिले आणि त्यानुसार त्याने ते पूर्णही केले. आज विवियनचे यशस्वी अभिनेत्याच्या यादीत गणले जाते.