Join us

टीव्ही कलाकारांची दिवाळी धम्माल,तुम्हीही शेअर करा तुमचे खास फोटो आणि बना lokmat.com फॅमिली No. 1

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2017 10:13 AM

प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करून आनंद लुटत असतात. सेलेब्स देखील त्यांच्या पद्धतीने दिवाळी उत्सव साजरा करत असतात. तु्म्हीही तुमच्या कुटुंबांची दिवाळी साजरी करा आमच्यासोबत एका काँटेस्टच्या माध्यमातून... लोकमत.कॉमच्या फॅमिली नंबर 1 या स्पर्धेमध्ये तुमच्या फॅमिलीचा फोटो पाठवा आणि जिंका आकर्षक बक्षीसे.

दिवाळी सर्वांसाठी एक आनंदाची पर्वणीच असते. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करून आनंद लुटत असतात. सेलेब्स देखील त्यांच्या पद्धतीने दिवाळी उत्सव साजरा करत असतात, आणि हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते.आम्ही आपणासाठी टीव्ही कलाकार दिवाळी कशी साजरा करतात याबाबत त्याचे मत जाणून घेतले आहे.तसेच तुम्हीही तुमच्या कुटुंबांसह खास दिवाळी सेलिब्रेशन केले असणारच.चला तर मग सहभागी व्हा आमच्यासोबत या खास काँटेस्टमध्ये.यात सहभागी होण्यासाठी तुमच्या फॅमिलीचा दिवाळी सेलिब्रेशनचा फोटो पाठवा आणि जिंका आकर्षक बक्षीसे. त्यासाठी contest.lokmat.com इथे क्लिक करा. 

जवळच्या मित्रांबरोबर दिवाळीचा आनंद...

वर्षभर बहुतेक वेळा मी शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने, दिवाळीचा उत्सव घरापासून दूर असतो. मागील तीन वर्षांपासून मी घरी दिवाळी साजरी केलेली नाही. आम्ही मुख्यत: एका मित्राच्या घरी संध्याकाळी एकत्रित होण्याचे नियोजन करतो. या वर्षी मी माझ्या जवळच्या मित्रांबरोबर मुंबईत दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे. आधीच्या दिवसांच्या आठवणींची आठवण करून देणारी एक शांततापूर्ण संध्याकाळ आम्ही एकत्र घालवत असतो. मी खूप खोडकर मुलगा होतो आणि दिवाळीच्या वेळी मी खूप फटाके फोडायचो. फटाक्याचा मोठा आवाज  येण्यासाठी मी प्लास्टिकच्या बाल्टी, तुटलेली प्लॅस्टीक बाटल्या इत्यादींसारख्या विविध तंत्रांचा वापर केला आहे. माझ्या खोड्यांमुळे दरवर्षी दिवाळीच्या वेळी माझ्या आईवडिलांना तक्रारींच्या पुराचा सामना करावा लागत असे. - विक्रमसिंह चौहान

प्रदुषणविरहित दिवाळी साजरी करते

मी नेहमी पारंपारिक पद्धतीने माझ्या परिवारासोबत दिवाळी साजरी करते. आम्ही एकत्र लक्ष्मीपूजन करतो आणि पारंपारिक पोषाख परिधान करतो. मला दिवाळीत फटाके फोडायला आवडत नाही कारण ते खूप प्रदूषण करतात. दिवाळी माझ्यासाठी प्रकाशाचा उत्सव आहे आणि मला लोकांनी केलेले विविध डेकोरेशन बघायला आवडते आणि  दिवाळीतल्या माझ्यासाठी महत्वाच्या तीन गोष्टी म्हणजे, माझ्या कुटुंबाबरोबर वेळ घालवणे, मिठाई खाणे आणि उत्सव साजरा करणे. या वर्षी मी दोनदा दिवाळी साजरा करणार आहे कारण आता मला दोन परिवार आहेत, एक माझा स्वत:चा आणि दुसरा मी काम करीत असलेल्या मालिकेचा परिवार.- आशी सिंग   

सुंदर रांगोळ्यांनी कॉरिडोअर सजवते

माझ्या जवळच्या व्यक्तींबरोबर वेळ घालवण्यासाठी, नेहमीच दिवाळी माझ्यासाठी विशेष असते. दिवाळी दरम्यान माझा आवडता भाग म्हणजे सुंदर रांगोळीच्या डिझाइनसह कॉरीडोरला सुशोभित करणे आहे. मी हे लहानपणापासून करते आहे आणि शक्य असल्यास आताही करते. मी काही वर्षांपासून कामानिमित्त घरापासून दूर मुंबईत स्थित झाले आहे, मात्र मी नेहमीच असे म्हणते की मी माझ्या कुटुंबासह उत्सव साजरे करते. दिवाळीमध्ये पारंपारिक पोशाक घालणे मला आवडते आणि मी नेहमीच आपल्या कुटुंबासह आणि नातेवाईकांसह कमीत कमी एक दिवस घालवण्याचा ठरवते कारण हा एक विशेष प्रसंग असतो जेव्हा आपण सगळे एकत्र येऊन आपल्या जीवनात आनंदाचा प्रकाश निर्माण करतो.-डोनाल बिश्त

दिवाळी म्हणजे माझ्यासाठी दुहेरी उत्सव..

जेव्हापासून मी कमवायला लागले, तेव्हा माझी पहिली दिवाळी माझ्या वाढदिवसाला झाली होती. हा माझ्यासाठी खरंच दुहेरी उत्सव होता. दिवाळीच्या वेळी माझ्या घराला सजवायला मला खूप आवडते. म्हणून दरवर्षी मी उत्सवाच्या काळात माझ्या घराला सजवण्यासाठी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत असते. लहानपणापासूनच, माझ्या घरातील दिवाळीच्या दिवशीच्या लक्ष्मीपूजनाची एक भाग राहिलेली आहे. ही पूजा झाल्यावरच खºया अर्थाने उत्सवाला सुरुवात होते.   - निकिता दत्ता 

गरजू लोकांना मदत करतो..

शांत आणि स्वच्छ पद्धतीने दिवाळी साजरी करण्यावर मी विश्वास ठेवते. दरवर्षी मी माझ्या कुटुंबासह आणि मित्रांसोबत दिवाळी साजरी करते. मी दिवाळीसाठी खरेदी करते आणि घरी स्वादिष्ट भोजन आणि नाश्ता बनवते. गेल्या काही वर्षांपासून मी माझ्या जाऊबाई सोबत रांगोळी करून घराला सजवण्याची सुरुवात केली आहे. दिवाळीच्या दिवशी, मी घरांना सजवण्यासाठी आणि उत्सवशील रंगीत दिसण्यासाठी फुलांचा वापर करते. यावर्षी मी माझ्या नवीन शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. लहानपणी आम्ही दिवाळीत फिरायला जायचो आणि उत्सवाच्या दिवे आणि रांगोळीच्या वेगवेगळ्या मांडणीकडे पाहायचो, फ्लॉवरच्या पाकळ्या असलेली रांगोळी माझी आवडती रचना असत. आजकल कामामुळे, आपण उत्सवासाठी जास्त वेळ देऊ शकत नाही. मला वैयक्तिकरित्या फटाके फोडायला आवडत नाही आणि अस वाटते की, फटाक्यांना पैसे वाया घालवण्यापेक्षा आपण ते पैसे गरजू किंवा गरीब लोकांना दिले पाहिजे.     - तोरल रासपुत्र

दिवाळी म्हणजे फराळाची रेलचेल!

दिवाळी म्हटले की, मला एक गोष्ट सगळ्यांत आधी आठवते आणि ती म्हणजे फराळ... जो मला खूप आवडतो. दिवाळीची वाट मी फराळासाठी बघते असं म्हणायला हरकत नाही. त्या फराळामधला आईच्या हातचा चिवडा आणि चकली मला खूप आवडते. लहानपणापासून मला संपूर्ण दिवाळी मधला भाऊबीज जास्त जवळचा वाटतो. आमचं एकत्र कुटुंब आहे त्यामुळे भाऊबीजच्या दिवशी आम्ही सगळे भावंडे मिळून खूप मजा करतो. माझी बहीण भावना हिच्यावर माझा खूप जीव आहे त्यामुळे हा दिवस माझ्या नेहमीच जवळ राहील. गिफ्टपेक्षा या दिवशी सगळ्यांच्या चेहºयावर जो आनंद असतो तो माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा अनमोल आहे. तितिक्षा माझ्यासाठी रव्याचा लाडू आहे... स्वभावाने गोड, वरून कडक वाटली तर क्षणार्धात विरघळणारी आणि सगळ्यांना आवडेल अशी !- तितिक्षा तावडे

गोड-तिखट चवींची सरमिसळ...!एका मालिकेच्या सेटवर दिवाळीची तयारी सुरु झाली आहे, घराला यावेळेस नवा रंग देण्यात येतो आहे कारण अक्षयच म्हणजेच माज्या नातवाचा हा पहिला पाडवा आहे. घरामध्ये सगळे मिळून फराळाची तयारी करत आहेत. कोणती साडी घालावी, मगं रंग सारखा नको, गजरे हवे सगळ्या घरातल्या बायकांची अशी चर्चा सुरु आहे. दिवाळीतले सगळेच दिवस तसे खास असतात पण, त्यातला माझ्या आवडीचा दिवस म्हणजे भाऊबीज. घरातले सगळे मंडळी एकत्र येतात, गप्पाहोतात, सगळ्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे ते कळतं त्यामुळे मज्जा येते. - सुकन्या कुलकर्णी