Join us

Bigg boss 17: 'या' स्पर्धकाला करायचंय पाकिस्तानी शोमध्ये काम; जाहीरपणे व्यक्त केली इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 16:17 IST

Tv actress: ही स्पर्धक सध्या बिग बॉस १७ च्या एका स्पर्धकाला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच चर्चेत राहणारा शो म्हणून बिग बॉसकडे पाहिलं जातं. नुकतंच या शोचं १७ वं पर्व पार पडलं. हे पर्व अनेक कारणांसाठी चर्चेत राहिलं. त्यात खासकरुन या शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक हा शो संपल्यानंतरही चर्चेत येत आहेत. यामध्येच सध्या या शोमधील एका महिला स्पर्धकाची चर्चा रंगली आहे. या महिला स्पर्धकाने पाकिस्तानी मालिकांमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

गेल्या काही काळात कलाविश्वाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. त्यामुळे अनेक जण कोरियन, हॉलिवूड वा पाकिस्तानी टीव्ही शो ला पसंती देत आहेत. यामध्येच आता बिग बॉस १७ फेम स्पर्धकाने पाकिस्तानी टीव्ही शोमध्ये काम करायची इच्छा व्यक्त केली आहे. अलिकडेच बिग बॉस १७ फेम आयशा खान हिने फिल्मीज्ञानला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने पाकिस्तानी शोमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

दरम्यान, मला पाकिस्तानी टीव्ही शो आवडतात. त्यामुळे संधी मिळाली तर मी नक्कीच याचा विचार करेन, असं आयशाने या मुलाखतीमध्ये सांगितलं. आयशा बिग बॉसमध्ये मुनव्वर फारुकीमुळे बरीच चर्चेत आली होती. सध्या ती बिग बॉस १७ चा रनर अप अभिषेक कुमार याला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनबिग बॉससेलिब्रिटीटिव्ही कलाकार