Join us

Bigg Boss 15 Winner: एका रात्रीत पलटली बाजी; 'हा' स्पर्धक होणार यंदाच्या पर्वाचा विजेता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 11:23 AM

Bigg Boss 15:काल झालेल्या ग्रँड फिनालेच्या पहिल्या भागात रश्मी देसाईला (rashmi desai) हा शो सोडावा लागला. त्यामुळे आता घरात शेवटचे ५ स्पर्धक राहिले आहेत.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच चर्चेत राहणारा बिग बॉस १५ (Bigg Boss 15) या शोचा ग्रँड फिनाले अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे आज (३० जानेवारी) बिग बॉसला त्याच्या १५ व्या पर्वाचा विजेता मिळणार आहे. सध्या या घरातील तेजस्वी प्रकाश (tejasswi prakash), करण कुंद्रा (karan kundra), शमिता शेट्टी (shamita shetty), निशांत भट्ट (nishant bhatt) हे स्पर्धक विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. परंतु, सूत्रांच्या माहितीनुसार, घरातील या स्पर्धकांव्यतिरिक्त अन्य एक स्पर्धकच बिग बॉसची ट्रॉफी घेऊन जाणार आहे.

काल झालेल्या ग्रँड फिनालेच्या पहिल्या भागात रश्मी देसाईला (rashmi desai) हा शो सोडावा लागला. त्यामुळे आता घरात शेवटचे ५ स्पर्धक राहिले आहेत. यात प्रतिक सहजपाल, करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, शमिता शेट्टी आणि निशांत भट्ट हे स्पर्धक राहिले आहेत. त्यातही तेजस्वी आणि करण हा शो जिंकतील अशी जोरदार चर्चा होतांना दिसत आहे. मात्र, या दोघांऐवजी शमिता शेट्टीच हे पर्व जिंकणार असल्याचं म्हटलं जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, निशांत भट्टने पैशांची ब्रिफकेस घेऊन हा शो सोडणार आहे. तर त्याच्या पाठोपाठ करण आणि तेजस्वीदेखील पैशांची बॅग घेऊन हा शो सोडणार आहेत. त्यामुळे घरात केवळ शमिता आणि प्रतिक हे दोन स्पर्धक राहणार आहेत. या दोघांमध्येच ग्रँड फिनाले रंगणार असून यांच्यापैकी एक स्पर्धक यंदाची बिग बॉस १५ ची ट्रॉफी घेऊन जाणार आहे. 

दरम्यान, शमिता शेट्टी यंदाच्या विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. कारण, शमिताने तिसऱ्यांदा बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली आहे. यात टास्क खेळण्यापासून घरातील सदस्यांसोबत असलेली बॉण्डिंग या सगळ्यासाठी ती चर्चेत राहिली. विशेष म्हणजे शमितासाठी आतापर्यंत १८ मिलिअन ट्विट्स करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाच्या पर्वात ती विजेती होणार असल्याचं म्हटलं जात आहे.परंतु, या पर्वात नेमकं कोण विजेता होणार हे आज रंगणाऱ्या ग्रँड फिनालेमध्येच कळणार आहे.  

टॅग्स :बिग बॉसटेलिव्हिजनटिव्ही कलाकारकरण कुंद्रातेजस्वी प्रकाशरश्मी देसाई