छोट्या पडद्यावरील वादग्रस्त ठरलेल्या बिग बॉस १५ (Bigg boss 15) या पर्वाची तेजस्वी प्रकाश विजेती ठरली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिची जोरदार चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे या पर्वात तेजस्वी, प्रतिक आणि करण हे तीन फायनलिस्ट ठरले होते. यात तेजस्वीने बाजी मारत बिग बॉसची ट्रॉफी जिंकली. तर प्रतिक सहजपाल उपविजेता ठरला. विशेष म्हणजे तेजस्वी जिंकल्यानंतर उपस्थित सर्वांना आनंद झाला. मात्र, तिचा प्रियकर करण कुंद्रा प्रचंड अपसेट असल्याचं दिसून आलं. त्यामुळे तेजस्वी जिंकल्याचा आनंद करणला न झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
विरल भय्यानी यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर करण कुंद्राचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये करण त्याच्या गाडीत बसला असून नाराज असल्याचं दिसून येत आहे. 'बिग बॉस'च्या सेटवरुन करण बाहेर पडल्यानंतर तो थेट त्याच्या कारमध्ये जाऊन बसला. फोटोग्राफर्सनेही त्याला फोटो काढण्यासाठी थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो न थांबताच निघून गेला. यावेळी तो नाराज असण्यासोबतच त्याच्या होण्यात अश्रू होते.
दरम्यान, करण छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. खासकरुन त्याची मुलींमध्ये कमालीची क्रेझ आहे. बिग बॉसच्या घरात करण आणि तेजस्वी एकमेकांना डेट करु लागले. विशेष म्हणजे दोघांच्या कुटुंबियांनीदेखील या नात्याला परवानगी दिली आहे. मात्र, तेजस्वी बिग बॉस १५ जिंकल्यानंतर आनंदी होण्याऐवजी तो नाराज झाल्यामुळे सर्वत्र त्याची चर्चा होत आहे.