Join us

फोटोत दिसणारी 'ही' चिमुकली आज आहे कलाविश्वातील सर्वात हॉट अभिनेत्री; तुम्ही ओळखलं का तिला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 15:53 IST

Nia sharma: सध्या सोशल मीडियावर एका चिमुकलीचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ही मुलगी एका छान फ्रॉकमध्ये दिसत असून तिच्या हातात एक टेडिबिअर आहे.

सध्याच्या काळात अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. यात कधी ते लाइव्ह येऊन संवाद साधतात. तर, कधी त्यांचे जुने वा नवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करतात. यामध्येच सध्या कलाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ही अभिनेत्री अत्यंत साधी दिसत असली तरीदेखील आज ती कलाविश्वातील सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

सध्या सोशल मीडियावर एका चिमुकलीचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ही मुलगी एका छान फ्रॉकमध्ये दिसत असून तिच्या हातात एक टेडिबिअर आहे.ही मुलगी या फोटोमध्ये एकदम निरागस दिसत आहे. मात्र, आता ती बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अनेकदा ती इंटरनेटवरही तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते.

फोटोमध्ये दिसणारी ही चिमुकली दुसरी-तिसरी कोणी नसून नागिन फेम निया शर्मा आहे. अनेकदा निया तिच्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत येते. परंतु, यावेळी ती तिच्या बालपणीच्या फोटोमुळे चर्चेत आली आहे. या फोटोमध्ये तिने then and now असे दोन फोटो शेअर केले आहेत. दरम्यान, अलिकडेच निया एका म्युझिक अल्बममध्ये झळकली होती. तसंच तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्येही काम केलं आहे. 

टॅग्स :निया शर्मासेलिब्रिटीबॉलिवूड