टीव्हीच्या दुनियेत गेल्या दोन वर्षांपासून टीआरपी चार्टवर आपला दबदबा कायम ठेवणारी मालिका म्हणजे ‘अनुपमा’. या मालिकेने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. कथा दमदार आहेच पण मालिकेची स्टारकास्टही तितकीच दमदार आहे. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे रुपाली गांगुली. या मालिकेत अनुपमा ही भूमिका साकारुन रुपाली प्रकाशझोतात आली. विशेष म्हणजे शांत आणि प्रेमळ स्वभावामुळे रुपाली अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. परंतु, शांत, संयमी वाटणाऱ्या रुपालीने खऱ्या आयुष्यात अनेकांशी पंगे घेतले आहेत. त्यामुळेच रुपाली गांगुलीचा मालिकेतील कोणत्या कलाकारांशी 36 चा आकडा आहे ते जाणून घेऊयात.
१. अनघा भोसले -
हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अनघा भोसले. उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणाऱ्या या अभिनेत्रीने आता अध्यात्माची वाट धरली आहे. मात्र, त्यापूर्वी ती अनुपमा या मालिकेत झळकली होती. या मालिकेदरम्यान तिच्या आणि रुपाली गांगुलीमध्ये अनेक मतभेद होते. दोघींचाही इगो क्लॅश व्हायचं असं म्हटलं जातं.
२. पारस कलनावत -
अनुपमा मालिकेत समर ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेता पारस कलनावत आणि रुपाली यांचं फारसं पटत नव्हतं. पारसने एका मुलाखतीमध्ये रुपालीने आपल्याला कशा पद्धतीची वागणूक दिली याविषयी भाष्य केलं.
३. सुधांशू पांडे-
अनुपमा मालिकेत सुधांशू पांडे यांनी वनराज शाह ही मुख्य भूमिका साकारली होती. मालिकेत सुशांधू आणि रुपाली यांनी पती-पत्नीची भूमिका साकारली होती. मात्र, खऱ्या आयुष्यात या दोघांचं जराही पटत नाही.
४. निधी शाह -
निधी शाह यांनी किंजल ही भूमिका साकारली होती. पारससोबत वाद झाल्यानंतर रुपालीने निधीसोबत बोलणंही बंद केलं होतं. निधी आणि पारस एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यामुळेच तिने निधीशी बोलणं बंद केल्याचं म्हटलं जातं.
५. मदलसा शर्मा -
अनुपमामधील काव्या म्हणजेच मदलसा शर्माचं रुपालीसोबत मोठं भांडण झालं होतं. तेव्हापासून या दोघी एकमेकींचं तोंड पाहात नाहीत.