टीव्ही मालिकांचे भव्यितव्य टीआरपीवर अवलंबून
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2017 10:06 AM
एखाद्या चित्रपटाचे भवितव्य जसे तिकिटबारीवर अवलंबून असते, तशी टीव्ही मालिकेचेही लोकप्रियातही दर आठवड्य़ाला मोजल्या टीआरपीवर अवलंबून असते. जेवढा मोटा ...
एखाद्या चित्रपटाचे भवितव्य जसे तिकिटबारीवर अवलंबून असते, तशी टीव्ही मालिकेचेही लोकप्रियातही दर आठवड्य़ाला मोजल्या टीआरपीवर अवलंबून असते. जेवढा मोटा टीआरपीचा आकडा तेवढी मालिकेचा प्रेक्षकसंख्या या टीआरपीमुळे स्पष्ट होत असते. मालिकेला सर्वोच्च टीआरपीचा आकडा मिळावा यासाठी निर्माते आणि अभिनेत्यांवर कायमचा दबाव असतो. ‘गुलाम’ या सर्वाधिक लोकप्रिय मालिकेत रंगीलाच्या व्यक्तिरेखेमुळे प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळविलेला अभिनेता परमसिंह याच्या मते मालिकेला लोकप्रयिता मिळवून देण्याची जबाबदारी ही सर्वस्वी कलाकाराची नसून मालिकेच्या टीमची असल्याचे मानतो.लोकांनी आपल्या मालिकेवर प्रेम करावे आणि तिची प्रशंसा करावी,अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. या विषयी बोलताना अभिनेता परमसिंह म्हणाला की,“कोणत्याही मालिकेच्या यशात हा कोण्या एका कलाकाराची जबाबदारी नसून मालिकेच्या संपूर्ण टीमची ही जबाबदारी असते.मालिकेत भूमिकेला न्याय मिळवून देण्याचे काम हे कलाकरा आपापल्या परीने निभावत असतो. मात्र ही मालिका माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे.आज या मालिकेमुळे मी फक्त एक अभिनेता म्हणूनच नाहीतर आर्थिकदृष्ट्याही सक्षम आहे. त्यामुळे या मालिकेला मिळणार टीआरीवर मी सतत लक्ष ठेऊन असतो.मुळात दरआठवड्याला टीआरपी रेटींग किती मिळाला याची स्वत:हुन मी चौकशी करत असतो.बहुतेक सर्वच कलाकारांना या गोष्टीची चिंता असावी. त्यामुळे मालिकेत कथानक,भूमिका आणि आता टीआरपी यावरही अभिनेत्यांचे लक्ष असल्याचे पाहायला मिळत असल्यामुळे टीआरपीची गणित नेमकी कशी असतात आणि रसिकांना कोणत्या प्रकारच्या गोष्टी जास्त आवडतात हे ही सप्ष्ट होत असते असे परमसिंह म्हणतो. लवकरच मालिकेत रंजक वळण पाहायला मिळणार आहे.