Join us

अनिशच्या वडिलांनी दिला लग्नाला नकार; रागाच्या भरात इशा सोडणार देशमुखांचं घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 13:34 IST

Aai kuthe kay karte: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे.  या प्रोमोमध्ये पहिल्यांदाच मालिकेत अनिशचे आई-बाबा दिसून येत आहेत.

छोट्या पडद्यावर गाजत असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते (aai kuthe kay karte). ही मालिका सुरु झाल्यापासून अरुंधतीच्या आयुष्यात अनेक चढउतार आले आहेत. परंतु, आशुतोषसोबत लग्न केल्यानंतक आता कुठे तिला चांगले दिवस दिसू लागले आहेत. मात्र, पुन्हा एकदा तिच्या सुखी संसारामध्ये मीठाचा खडा पडणार आहे. इशा आणि अनिशच्या लग्नाला अनिशच्या वडिलांनी नकार दिला आहे.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे.  या प्रोमोमध्ये पहिल्यांदाच मालिकेत अनिशचे आई-बाबा दिसून येत आहेत. इतकंच नाही तर ईशाविषयी सगळी माहिती समजल्यानंतर ते या लग्नाला नकार देतात. 

दरम्यान, अनिशच्या वडिलांनी नकार दिल्यानंतर संतापलेल्या इशाने देशमुखांचं घर सोडलं आहे. घर सोडल्यानंतर इशा थेट आशुतोषच्या घरी राहायला जाणार आहे. इशाला असं अचानक घरी आलेलं पाहून अरुंधतीही थक्क होणार आहे. त्यामुळे आता इशा आणि अनिशचं लग्न होण्यासाठी अरुंधतीला पुन्हा कोणता संघर्ष करावा लागेल हे येत्या भागातच प्रेक्षकांना कळणार आहे. 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटेलिव्हिजनसेलिब्रिटी