Join us

प्रतीक्षा संपली! अखेर 'तारक मेहता'मध्ये झाली दयाबेनची ग्रँड एन्ट्री; Video viral

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2022 11:41 AM

Taarak mehta ka ooltah chashmah: गेल्या काही काळापासून दयाबेन या मालिकेपासून दूर होती. मात्र. आता या मालिकेत पुन्हा दयाबेनची एन्ट्री होणार आहे.

गेल्या १२-१३ वर्षांपासून अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी लोकप्रिय मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (taarak mehta ka ooltah chashmah). ही मालिका अनेक कारणांसाठी खास ठरली. उत्तम कथानक, कलाकारांचा दर्जेदार अभिनय आणि मालिकेची योग्य पद्धतीने केलेली मांडणी यामुळे ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. त्यातच मालिकेतील दयाबेन, जेठालाल, भिडे मास्तर, अय्यर, सोढी आणि डॉ. हाथी या काही भूमिका विशेष गाजल्या. आतापर्यंत या मालिकेत काही नव्या कलाकारांची एन्ट्री झाली. तर, काही कलाकारांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. परंतु, या मालिकेतील दयाबेनची लोकप्रियता यत्किंचितही कमी झाली नाही. गेल्या काही काळापासून दयाबेन या मालिकेपासून दूर होती. मात्र. आता या मालिकेत पुन्हा दयाबेनची एन्ट्री होणार आहे.

गेल्या काही काळापासून दयाबेन म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानी या मालिकेपासून दूर होती. त्यामुळे या मालिकेत ती पुन्हा कधी दिसणार हा एकच प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. इतकंच नाही तर ही भूमिका आता दयाबेन ऐवजी अन्य दुसरी अभिनेत्री साकारणार असल्याचंही म्हटलं जात आहे. यामध्येच सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दयाबेनची एन्ट्री होताना दाखवली आहे. परंतु, या भूमिकेत पुन्हा दिशा वकानी झळकणार की अन्य दुसरी अभिनेत्री हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. इतकंच नाही तर नव्या दयाबेनला पाहण्यासाठी चाहते कमालीचे आतुर झाले आहेत. त्यामुळे या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे. 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मादिशा वाकानीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार